नाशिक

शीतलहरींमुळे नाशिककर गारठले

नाशिक:प्रतिनिधी

उत्तर भारतातून येणार्या शीतलहरीमुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. काल दिवसभर वातावरणातील  गारव्यामुळे नागरिक थंडीने गारठून गेले.  गुरूवारची (दि.15) पहाट उजाडली तीच दाट धुके घेऊन.शहरावर दाट धुक्याची चादर आच्छादलेली होती. शहरात गेल्या काही  दिवसापासून  थंडीचा कडाका वाढला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत तर सुर्यदर्शनही झाले नाही ..त्यात दिवसभर वातावरणात गारवा होता .. तर संध्याकाळी 6 वेळेनंतर परत वातावरणात धुके निर्माण झाले होते.. परिणाम  थंडीने नाशिककर चांगलेच गारठले आहेत.शहरात सातत्याने वातावरणात बदल होत आहे.  शहरातील नागरिकांसाठी धुक्याची वेगळी गंमत असली तरी शेतकर्‍यांची मात्र धाकधूक वाढली आहे. उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे वातावरणात गारवा आणि थंडी वाढली आहे.

मात्र, दाट   धुके पडल्याने नागरिक  मनमोहक अशा धुक्याचा आनंद घेताना दिसली . काल अधिकच दाट धुके पडले होते. पहाटेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत धुके होते. तोपर्यंत चांगलचा गारठा जाणवत होता.

गंगापूर रोड,उपनगर,नाशिक रोड,इंदिरा नगर, सातपूर, अंबड, पाथर्डी फाटा यासह शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धुके पडले होते.हिवाळ्यात नाशिक शहरात दरवर्षी दाट धुके पडते. पण यंदा सातत्याने वातावरणात बदल होत आहे. शहरात दाट पडलेल्या धुक्यात जॉगींगसाठी आलेल्या नाशिककरांनी चहा टपर्यावर गर्दी केली होती .तर अनेकांनी धुक्यामध्ये फोटो काढत सोशल मिडीयावर अपलोड केले. नाशिककर धुक्याच्या दुलाईचा आनंद घेताना दिसत होते.

थंडीत खाद्य पदार्थाचा आस्वाद

थंडी वाढल्याने थंडीपासून बचावासाठी  अनेक जण वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यात खवय्ये मात्र थंडीचा आस्वाद घेत असतानाच कुरकुरीत भज्जी चा आस्वाद घेत आहेत. चहा आणि गरम भज्जी असे थंडी विसरायला लावणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात नाशिककर दंग असल्याचे चित्र आहे.

दिवसभर स्वेटरमध्येच वावर

यंदाच्या वर्षी थंडीचा कडाका जाणवत नव्हता .मात्र जानेवारीच्या सुरूवातीपासूनच दिवसेंदिवस थंडीत वाढ होत आहे.  त्यात काल दिवसभर थंडीत धुके ही असल्याने वातावरणात अधिक गारठा होता .त्यामुळे नाशिककरांनी  दिवसभर गरम कपडे परिधान केल्याचे चित्र होते.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago