नाशिकरोड: प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ युवकास पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट क्र २ चे प्रकाश भालेराव यांना गुप्त बातमी मिळाली की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर नवले कॉलनी कडे जाणाऱ्या रोडवर एक संशयित तलवार बाळगून आहे. वरिष्ठांना कळवून त्वरित सहायक पोलीस उपनिरीक्षक शेळके पोलीस हवालदार काळे, प्रकाश बोडके, सुगन साबरे आदींनी वरील ठिकाणी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. प्रदीप आबा चव्हाण राहणार सामनगाव रोड सिन्नर फाटा नाशिक रोड असे त्या युवकाचे नाव असून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ प्लास्टिक गोणी मध्ये एक लोखंडी तलवार मिळून आल्याने त्याचा पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4/25 व मुंबई पोलीस ॲक्ट 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धारदार हत्यारे बाळगणाऱ्या टोळक्यावर नजर ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांनी शहरात गुन्हेगारावर कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हेगारावर कारवाया सुरू केल्या आहेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार खैरे पुढील तपास करीत आहेत.