नाशिक रोडला तलवार बाळगणाऱ्या युवकास घेतले ताब्यात

नाशिकरोड: प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ युवकास पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट क्र २ चे प्रकाश भालेराव यांना गुप्त बातमी मिळाली की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर नवले कॉलनी कडे जाणाऱ्या रोडवर एक संशयित तलवार बाळगून आहे. वरिष्ठांना कळवून त्वरित सहायक पोलीस उपनिरीक्षक शेळके पोलीस हवालदार काळे, प्रकाश बोडके, सुगन साबरे आदींनी वरील ठिकाणी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. प्रदीप आबा चव्हाण राहणार सामनगाव रोड सिन्नर फाटा नाशिक रोड असे त्या युवकाचे नाव असून त्याची झडती  घेतली असता त्याच्याजवळ प्लास्टिक गोणी मध्ये एक लोखंडी तलवार मिळून आल्याने त्याचा पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4/25 व मुंबई पोलीस ॲक्ट 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धारदार हत्यारे बाळगणाऱ्या टोळक्यावर नजर ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांनी शहरात गुन्हेगारावर कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हेगारावर कारवाया सुरू केल्या आहेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार खैरे पुढील तपास करीत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

4 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

4 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

4 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

5 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

5 hours ago

नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर

नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…

5 hours ago