नाशिकरोड ‘एमपीए’च्या पदाधिकार्‍यांची निवड

नाशिकरोड : वार्ताहर
युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा डायलेट करण्याचे टाळता येते. तसेच वारंवार कॅथेटरचा वापरही टाळता येऊ शकतो. नाशिकमध्ये ही सुविधा आता उपलब्ध झाली आहे, अशी माहिती किम्स मानवता हॉस्पिटलचे प्रसिद्ध किडनी रोगतज्ज्ञ डॉ. परीक्षित महाजन यांनी दिली. तसेच याच हॉस्पिटलमधील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मयूर पेखळे यांनी (गुडघे) जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल सविस्तर माहिती दिली. ऑस्ट्रिओअथ्रायटिस (संधिवात) असणार्‍या रुग्णांमध्येही विशेषतः वयस्कर रुग्णांमध्ये विविध किचकट सर्जरी यशस्वीपणे पार केल्याचे त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून दाखवून दिले. डॉ. परिक्षित महाजन यांनीही दृकश्राव्य माध्यमाचा आपल्या भाषणात उपयोग करून केलेल्या शस्रक्रियांची माहिती दिली या दोघांनीही अतिशय उद्बोधक माहिती दिली. सर्व डॉक्टरांनी टाळ्यांच्या गजरात या दोघांचे कौतुक केले.
नाशिकरोड मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी श्री धन्वंतरीचे पूजन मान्यवर डॉक्टरांनी केले. डॉ. परिक्षित महाजन यांचा डॉ. अशोक निरगुडे यांनी तर डॉ. मयूर पेखळे यांचे स्वागत व सत्कार एमपीएचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पुंड यांनी केले. सचिव डॉ. आसिफ तांबोळी व वूमन्स फोरम चेअरपर्सन डॉ. सौ.सुनयना भुजबळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अध्यक्ष डॉ.प्रकाश पुंड यांनी दोन वर्षे सहकार्य केल्याबद्दल डॉक्टरवृंदांचे व सचिव डॉ. आसिफ तांबोळी यांचेही आभार मानले. यावेळी डॉ. पुंड यांनी पुढील वर्षासाठी डॉ. आसिफ तांबोळी यांची अध्यक्षपदासाठी सूचना केली. त्याला सर्व डॉक्टरांनी टाळ्यांचा गजरात अनुमोदन दिले. डॉ.अशोक निरगुडे यांनी एमपीएच्या कार्याचा आढावा सादर करत हेच कार्य यापुढेही उत्तम चालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ.तांबोळी यांनी सेक्रेटरीपदी डॉ. धनंजय पाटील, सहसेक्रेटरीपदी डॉ. शेखर ठाणगे, खजिनदारपदी डॉ. महेंद्र गाडेकर आणि वूमन फोरमवर डॉ. संगीता सरोदे यांची निवड घोषित केली.
डॉ. राजेंद्र अमृतकर यांचे सहकार्याबद्दल कौतुकही करण्यात आले. ज्येष्ठ डॉ. मामा सहस्रबुद्धे, डॉ. धनंजय पेखळे आदींचाही सन्मान करण्यात आला. यावेळी एमपीएचे मावळते खजिनदार डॉ. प्रमोद पाटील, सहसचिव डॉ.संतोष धात्रक हेही उपस्थित होते.
सदस्य डॉ. समीर लासुरे, डॉ. लियाकत नामोले, डॉ. सचिन खुर्दळ, डॉ. नितीन म्हस्के, डॉ. चंद्रकांत बोरसे, डॉ. लअरिफ शेख, डॉ. रवींद्र कुटे, डॉ. अमित विसपुते, डॉ. धनंजय पाटील, डॉ.दीपक सरोदे, डॉ.सुरेश आहेर, डॉ.वंदना आहेर, डॉ.स्मिता ठाणगे, डॉ.शैलेश पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नांदेडकर, डॉ. निखिल आडके, डॉ.संदीप भवर, डॉ.नितीन बुवा, डॉ.अनिल भावसार, डॉ. नावेद खान, डॉ. विराज दाणी, डॉ. बाळासाहेब मोकळ,डॉ. प्रसाद संधान,डॉ. राजेंद्र व डॉ. राजश्री हरक डॉ. विजय व डॉ. सौ गवळी, डॉ. उमेश नगरकर, डॉ. महेश भालेराव, डॉ. सपना मते, डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. रवींद्र कहांडळ आदी उपस्थित होते.

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago