नाशिक

नौदलातील जवान संदीप महाले कर्तव्य बजावताना शहीद

चांदवड तालुक्यावर शोककळा; भुताणेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चांदवड : वार्ताहर
गरीब शेतकरी कुटुंबातून जिद्दीच्या जोरावर भारतीय नौदलात झेप घेणारा चांदवडचा सुपुत्र, जवान संदीप जगन्नाथ महाले (वय 32) यांना विशाखापट्टणम् येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. रविवारी (दि. 22) त्यांच्या मूळगावी भुताणे येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसागराने साश्रू नयनांनी लाडक्या वीरपुत्राला निरोप दिला.
एनसीसीच्या गणवेशातील त्यांचे स्वप्न साकार झाले होते. संदीप महाले यांचे प्राथमिक शिक्षण मूळगावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पिंपळगाव येथील महाविद्यालय गाठले. या महाविद्यालयात असताना एनसीसीमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांच्या डोळ्यात देशसेवेचे स्वप्न चमकत होते. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही, त्यांनी हार न मानता शारीरिक कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर 2012 मध्ये भारतीय नौदलात प्रवेश मिळवला. त्यांच्या या यशाने संपूर्ण कुटुंबाला मोठा आधार मिळाला होता.
संदीप हे नौदलात एलटी पदावर कार्यरत होते. त्यांनी सलग 14 वर्षे देशाचे रक्षण केले. सध्या त्यांची नियुक्ती विशाखापट्टणम् येथे होती. 21 फेब्रुवारी 2026 रोजी कर्तव्यावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. देशसेवेचे व्रत अखेरच्या श्वासापर्यंत निभावणार्‍या या जवानाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शहीद संदीप यांचे पार्थिव रविवारी दुपारी साडेबाराला भुताणे येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. ’शहीद संदीप महाले अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जि. प. शाळेच्या पटांगणात पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी दिली. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Navy jawan Sandeep Mahale martyred in the line of duty

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

4 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

4 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

4 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

4 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

5 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

5 hours ago