काय झाडी काय डोंगरचा खर्च सामान्यांच्या माथी : प्रेरणा बलकवडे
नाशिक : प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, भारती भोई, वर्षा लिंगायत, सरिता पगारे, योगिता आहेर, सुरेखा पठाडे,संगिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्यांनी डोक्यावर लाकडाची मोळी व गोवर्या घेऊन हल्लाबोल करत सरकारचा निषेध केला.
सेनेच्या बंडखोर आमदारांची सूरत व गुवाहाटी वारी जनतेच्या माथी. बंडखोर आमदारांवर केलेला खर्च मोदींनी पद्धतशीर वसूल करण्यास सुरुवात केली असून, मोदी सरकारने पुन्हा गृहिणींच्या माथी लाकडाची मोळी लादली आहे. केंद्र सरकारने सिलिंडर दरात 50 रुपयांनी वाढ केल्याने 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी नागरिकांना 1,053 रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरने हजारचा आकडा पार केल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यापूर्वी मे महिन्यातही गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. सत्तेवर येण्यासाठी भाजप नेत्यांच्या संवेदना मेल्या आहेत. म्हणूनच या संवेदनाहीन सरकारचे दरवाढ केलेले सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत आहेत असे सांगत क्या पेट्रोल, क्या डिझेल, क्या गॅस.. समदं ओके मध्ये म्हणता म्हणता हे सरकार सबका सत्यानाश करत असल्याचा आरोप प्रेरणा बलकवडे यांनी केला.
महिला आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध करत बहोत हुई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार! अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्व सामान्य जनतेला गॅस परवडणार नाही म्हणून आंदोलकांकडून लाकडाच्या मोळी व गोवर्या भेट देण्यात आल्या. यावेळी, सुवर्णा गांगोडे, शितल भोर, संगीता राऊत, भारती खिरारी, ज्योती भोर, मंगल माळी, सुरेखा कुर्हाडे, रूपाली अहिरे,, निशा झनके, रूपाली तायडे, वैशाली ठाकरे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…