महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या महिलांचे गॅस दरवाढीविरुद्ध आंदोलन

काय झाडी काय डोंगरचा खर्च सामान्यांच्या माथी : प्रेरणा बलकवडे

नाशिक : प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, भारती भोई, वर्षा लिंगायत, सरिता पगारे, योगिता आहेर, सुरेखा पठाडे,संगिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्‍यांनी डोक्यावर लाकडाची मोळी व गोवर्‍या घेऊन हल्लाबोल करत सरकारचा निषेध केला.
सेनेच्या बंडखोर आमदारांची सूरत व गुवाहाटी वारी जनतेच्या माथी. बंडखोर आमदारांवर केलेला खर्च मोदींनी पद्धतशीर वसूल करण्यास सुरुवात केली असून, मोदी सरकारने पुन्हा गृहिणींच्या माथी लाकडाची मोळी लादली आहे. केंद्र सरकारने सिलिंडर दरात 50 रुपयांनी वाढ केल्याने 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी नागरिकांना 1,053 रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरने हजारचा आकडा पार केल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यापूर्वी मे महिन्यातही गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. सत्तेवर येण्यासाठी भाजप नेत्यांच्या संवेदना मेल्या आहेत. म्हणूनच या संवेदनाहीन सरकारचे दरवाढ केलेले सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत आहेत असे सांगत क्या पेट्रोल, क्या डिझेल, क्या गॅस.. समदं ओके मध्ये म्हणता म्हणता हे सरकार सबका सत्यानाश करत असल्याचा आरोप प्रेरणा बलकवडे यांनी केला.
महिला आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध करत बहोत हुई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार! अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्व सामान्य जनतेला गॅस परवडणार नाही म्हणून आंदोलकांकडून लाकडाच्या मोळी व गोवर्‍या भेट देण्यात आल्या. यावेळी, सुवर्णा गांगोडे, शितल भोर, संगीता राऊत, भारती खिरारी, ज्योती भोर, मंगल माळी, सुरेखा कुर्‍हाडे, रूपाली अहिरे,, निशा झनके, रूपाली तायडे, वैशाली ठाकरे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago