नाशिक

जलवाहिनीच्या कामासाठी नवा सिमेंटचा रस्ता खोदला

सिडको : प्रतिनिधी
महापालिकेकडून सिडकोतील शिवशक्ती चौक परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम करताना काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता खोदण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्यालगत पर्यायी जागा उपलब्ध असतानाही नव्याने तयार झालेला रस्ता फोडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रभाग 26 मधील शिवशक्ती चौक व नवजीवन डे स्कूल परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून नव्या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी जलवाहिनी टाकताना पर्यायी मोकळ्या जागेचा वापर न करता थेट नव्याने तयार झालेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता फोडण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच महापालिकेने नागरिकांच्या कराच्या पैशांतून लाखो रुपये खर्च करून हा रस्ता तयार केला होता. आता त्याच रस्त्याची तोडफोड होत असल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. जलवाहिनीच्या कामामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून संबंधित ठेकेदार व महापालिकेच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

New cement road dug for water pipeline work

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago