दमट हवेमुळे उकाडा कायम
नाशिक : प्रतिनिधी
मे महिन्याच्या अखेरीस नाशिककरांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळत असला, तरी हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची भावना कायम असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या कमाल तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअसची घट झाली असली, तरी दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार बुधवारी (दि. 21) नाशिकमध्ये कमाल तापमान 36.4 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सकाळी सापेक्ष आर्द्रता 79 टक्के होती, तर सायंकाळी ती 45 टक्क्यांपर्यंत खाली आली. मागील 24 तासांत पावसाची कोणतीही नोंद झाली नसली, तरी हवेतील आर्द्रता आणि उष्ण वार्यांमुळे दिवसभर उकाडा जाणवत राहिला. गेल्या आठवड्यात शहरातील तापमान 39 अंशांच्या पुढे गेले होते. त्यानंतर ढगाळ वातावरण, अधूनमधून वाहणारे वारे आणि वातावरणातील बदलामुळे तापमानात घट झाली आहे. मात्र, उष्णतेसोबत वाढलेल्या दमटपणामुळे नागरिकांना घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत रस्त्यांवर वर्दळ कमी दिसून आली.
शहरातील बाजारपेठा, बसस्थानके आणि चौकांमध्ये दुपारच्या वेळी उष्णतेचा परिणाम जाणवत असून, थंड पेये, उसाचा रस, लिंबूपाणी आणि आइस्क्रीमच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. अनेकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळण्याचा पर्याय स्वीकारला.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस वातावरणात बदल कायम राहण्याची शक्यता असून, काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तापमानात आणखी थोडी घट होऊ शकते; मात्र आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना भरपूर पाणी पिणे, थेट उन्हात दीर्घकाळ न थांबणे, हलका आहार घेणे आणि लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
Temperature drops by three degrees in three days
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…