निफाडचा  पारा १२ अशांवर

गुलाबी थंडीची चाहुल
निफाडचा  पारा १२ अशांवर

निफाड । प्रतिनिधी
निफाडसह तालुक्यातील राजकीय वातावरण तप्त होत असले तरी हवामानात मात्र गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे मंगळवार दि १२ नोव्हे रोजी निफाडचा पारा १२ अंशावर घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात करण्यात आली आहे
निफाडसह तालुक्यात सध्या विधानसभेचे वातावरण गरम होत आहे मात्र गेल्या पाच सहा दिवसांपासुन थंडीची चाहुल लागली आहे सोमवार मध्यारात्रीपासुन बोचरी थंडी जाणवत होती थंडीमुळे गावागावात रस्त्यावर पहाटे सायकलिंग पायी व्यायामासाठी फिरणारे युवक व जेष्ठ नागरीकांची वर्दळ दिसत आहे ऊबदार कपडे व शेकोटी भोवती राजकिय गप्पांनीच गुलाबी थंडीतील दिवसाची सुरुवात होत आहे निफाड शहरातील युवा वर्गाकडुन व्यायामाला विशेष महत्व दिले जात आहे गोदावरी विनता कादवा या नद्यांमध्ये शांत पाणी असल्याने पहाटे पोहण्याचा मनमुराद आनंद घेत व्यायाम केला जात आहे

@ निफाड शहरातु‌न आम्ही दररोज पहाटे कोठुरे येथील गोदावरी नदीपात्रात तसेच रौळस येथिल कादवा नदीपात्रातील‌ जलाशयात पोहण्यासाठी जातो यामुळे व्यायाम होतो निफाड शहर व परिसरातील गावांतुनही अनेक युवक पोहण्यासाठी येतात
डॉ॰ नितीन धारराव
निफाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *