नाशिक

निफाडला मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

वीजपुरवठा खंडित; शेतकर्‍यांची तारांबळ

निफाड ः प्रतिनिधी
काल बुधवारी दुपारनंतर तालुक्यात बेमोसमी पावसाने अचानक हजेरी लावत शेतकर्‍यांची तारांबळ उडवून दिली. विजांच्या कडकडाटात धुवाधार पावसाला सुरुवात होताच निफाडसह परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान, पाऊस पडता झाल्याने शेतकरी खरीप हंगाम पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांत व्यस्त झाला असतानाच, कालच्या पावसामुळे निफाड, हिवरगाव, सायखेडा बाजार आवारात पाणी साचल्याने दुपारनंतर शेतमाल लिलाव प्रक्रिया काहीशी विस्कळीत झाली होती. काल बुधवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भरवस फाटा, विंचूर, उगाव, वनसगाव, सारोळे खुर्द, रानवड, पालखेड या परिसरातून सुरू झालेल्या पावसाने नंतर निफाड, कोठुरे, म्हाळसाकोरेसह तालुक्याचा उर्वरित भाग कवेत घेत चौफेर हजेरी लावली. अवेळी आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत व्यावसायिक आपला माल झाकण्यात व्यस्त झाले. तालुक्यात म्हाळसाकोरे, खेडलेझुंगे येथील आठवडे बाजारात आलेले व्यावसायिक ग्राहक यांची या पावसामुळे धावपळ उडाली. परिणामी, ज्या शेतकर्‍यांचा कांदा शेतातून काढणे बाकी आहे, तो कांदा आता खराब होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावणे सुरू ठेवल्याने आणि काल बुधवारी मात्र जास्तच बरसल्याने कोरड्याठाक पडलेल्या विहिरी, पाझर तलाव यांना पाणी उतरण्याची शक्यता तयार झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट टाळण्यास मदत झाली असून, हवेत गारवा तयार झाल्याने उन्हाच्या उकाड्यापासून काहीकाळ नागरिकांची सुटका झाली आहे. निफाडमध्ये दुपारी 3.15 वाजता सुरू झालेल्या पावसाने 4.30 वाजता विश्रांती घेतली. पाऊस व वाहतूक कोंडी नित्याचीच पावसाला सुरुवात होताच निफाडच्या बसस्थानकापासून ते शांतीनगर चौफुलीपर्यंत वाहतुकीची होणारी कोंडी आता नित्याची झाली आहे. कालदेखील याचा प्रत्यय आला. कारण शहरातील पाणी याच ठिकाणी येऊन ते रस्त्यावरून वाहते. तर काँक्रीटच्या रस्त्यावर आणि साइडपट्टी खोल यामुळे वाहनचालक वाहने रस्त्याच्या खाली उतरविण्यास धजावत नाही. उगाव रोड, उपबाजार आवार, बसस्थानक आणि शहरासह पिंपळगाव रोडने येणारी वाहने याच ठिकाणी येतात. त्यामुळे वाहनांची गर्दी होऊन अनेक वेळा रहदारी ठप्प होते.

Gavkari Admin

Recent Posts

गोदावरीची महाआरती 200 युवा सैनिकांच्या हस्ते

नाशिक ः प्रतिनिधी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे होणार्‍या गोदावरी महाआरतीस…

9 hours ago

विभागात पॉलिटेक्निकच्या 24,680, आयटीआयच्या 15,224 जागा

नाशिक ः प्रतिनिधी इयत्ता दहावीचा राज्य शिक्षण मंडळासह सीबीएसईचाही निकाल जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचा…

9 hours ago

पाथर्डीत अवकाळी पावसामुळे गटारी तुंबल्या

सुदाम डेमसे यांच्या मध्यस्थीने तत्काळ कार्यवाही सिडको : विशेष प्रतिनिधी प्रभाग 31 पाथर्डी परिसरात झालेल्या…

10 hours ago

पावसाळ्यापूर्वी धरणांमधील गाळ काढा

जि. प. सीईओ मित्तल : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण, तलावांतून…

10 hours ago

पाइपलाइनसाठी तीनशे झाडांवर कुर्‍हाड!

वृक्षप्रेमींकडून विरोध होण्याची शक्यता नाशिक : प्रतिनिधी जुन्या जलवाहिनीची वारंवार गळती होत असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी…

10 hours ago

चेतनानगरमध्ये गाडीची काच फोडून मुद्देमाल लंपास

सिडको : चेतनानगरमधील बाजीराव आव्हाड चौक परिसरात पार्क केलेल्या क्रेटा गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्याने…

10 hours ago