निवृत्तीनाथ मंदिराच्या कळसाला सोनेरी साज!

वारकर्‍यांनी दिले इतके सोने

नाशिक : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, मंदिराला सोन्याचा कळस चढविण्यात येणार आहे. मंदिराच्या कळसासाठी वारकर्‍यांनीही आपल्यापरीने योगदान दिले असून, सव्वाशे तोळे सोने या कळसासाठी लागणार आहे. त्यासाठी सोने जमविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
एक हजार वर्षे टिकू शकेल अशा काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराला पूर्वी पितळी कळस बसविण्यात येणार होता. परंतु संस्थानचे माजी अध्यक्ष पंडीत महाराज कोल्हे यांनी कलस सोन्याचा असावा असा आग्रह सहधर्मदाय आयुक्तांकडे धरला. केवळ आग्रहच धरला नाही तर त्यांनी तातडीने 32 ग्रँम सोनेही दान करत या योगदानाला प्रारंभ केला. शिवाय गावोगावी झालेल्या कीर्तन, प्रवचनात केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला. महंत राजाभाऊ होळकर यांनी 10 ग्रँम,संपत महाराज धोंगडे 11 ग्रँम, महंत योगानंद माऊली 10 ग्रँम,ज्ञानेश्‍वर माऊली कदम 5 ग्रँम, उंबरखेड ग्रामस्थ 17 ग्रँम, संपत धात्रक 10 ग्रँम, शिवाजी जेऊघाले 10 ग्रँम याप्रमाणे सोने जमा झाले आहे. साधारणत: सव्वाशे तोळे सोने या कळसासाठी लागणार असल्याचे सुवर्णकारांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *