वारकर्यांनी दिले इतके सोने
नाशिक : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, मंदिराला सोन्याचा कळस चढविण्यात येणार आहे. मंदिराच्या कळसासाठी वारकर्यांनीही आपल्यापरीने योगदान दिले असून, सव्वाशे तोळे सोने या कळसासाठी लागणार आहे. त्यासाठी सोने जमविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
एक हजार वर्षे टिकू शकेल अशा काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराला पूर्वी पितळी कळस बसविण्यात येणार होता. परंतु संस्थानचे माजी अध्यक्ष पंडीत महाराज कोल्हे यांनी कलस सोन्याचा असावा असा आग्रह सहधर्मदाय आयुक्तांकडे धरला. केवळ आग्रहच धरला नाही तर त्यांनी तातडीने 32 ग्रँम सोनेही दान करत या योगदानाला प्रारंभ केला. शिवाय गावोगावी झालेल्या कीर्तन, प्रवचनात केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला. महंत राजाभाऊ होळकर यांनी 10 ग्रँम,संपत महाराज धोंगडे 11 ग्रँम, महंत योगानंद माऊली 10 ग्रँम,ज्ञानेश्वर माऊली कदम 5 ग्रँम, उंबरखेड ग्रामस्थ 17 ग्रँम, संपत धात्रक 10 ग्रँम, शिवाजी जेऊघाले 10 ग्रँम याप्रमाणे सोने जमा झाले आहे. साधारणत: सव्वाशे तोळे सोने या कळसासाठी लागणार असल्याचे सुवर्णकारांनी सांगितले.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…