नाशिक मनपाची अशीही मेहरबानी: विकासकासाठी बारा मिटरचा रस्ता नऊचा केला

विकासकासाठी बारा मिटरचा रस्ता नऊचा केला

माजी मंत्री बच्चू कडुंचे मनपा आयुक्तांना पत्र

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक महापालीकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आग्रा हायवे येथील सरस्वती मंदिर रोड परिसरातील एका बांधकाम व्यवसायिकास अनधिकृतपने मदत करत बारा मिटरचा रस्ता थेट नऊ मीटर करून टाकला. दरम्यान याप्रकरणी आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना पत्र पाठवत संबंधित विकासाच्या बांधकामास परवानगी कशी दिला. याबाबत विचारणा करत याप्रकरणी वेळीच लक्ष न दिल्यास महापालिकेच्या कारभाराविरोधात थेट अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे याकडे लक्ष न दिल्यास हे प्रकरण पालिकेवर शेकू शकते.

दरम्यान सरस्वती मंदिर रोड परिसरातील नागरिकांनी बचू कडू यांची भेट घेत त्यांच्याकडे ही समस्या मांडली. कडू यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे कीं, मनपा हद्दीतील 35 वर्षापूर्वी पासून मंजूर असलेला 12 मीटरचा सरस्वती मंदिर रोड विकासकाच्या आर्थिक फायद्यासाठी 9 मीटर करून त्यास बांधकामास परवानगी कशी दिली. सर्वे नंबर 252/2 व 252/3 मधून जाणारा सरस्वती मंदिर रोड (मुंबई आग्रा हायवे लगत) हा 35 वर्षापासून 12 मीटर मंजूर असताना सर्वे नंबर 252/2 वगळता बाकीच्या सर्व मिळकत धारकांचे लेआउट, बिल्डिंग प्लॅन व पूर्णत्वचा दाखला 12 मीटर प्रमाणेच नगर रचना विभागाने यांनी मंजूर केले. मात्र विकासक . ताराचंद देवीसहाय गुप्ता यांना सर्वे नंबर 252/2 मधील यांच्या बांधकामास 12 मीटरच्या ऐवजी 9 मीटरचा रोड कशाच्या आधारे मंजूर केला? तसेच महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी टिपणी वरती व आदेशावरती बिल्डिंग प्लॅन मंजूर केला त्यांच्यावरती काय कारवाई केली? याचा लेखी खुलासा या कार्यालयास त्वरित करावा. अशी मागणी आयुक्ताकडे केली आहे. दरम्यान महापालिका आयुक्त हे प्रकरण कसे हाताळता हे पहावे लागणार आहे.

14 वेळेस निवेदन मात्र पदरी निराशाच

येथील रहिवाशांनी मुंबई आग्रा महामार्गा वरील
सरस्वती मंदिर रोड परिसरतील रहिवाशांनी सदर विकासाकचे सुरु असलेल्या बांधकामाबाबत तब्बल चवदा वेळेस पालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला. काही दिवसापूर्वी प्रहारचे जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांनी देखील रहिवाशांना घेउंन निवेदन दिले होते मात्र नेहमीप्रमाणे पालिकेने रहिवाशांच्या या तक्रारीकडे वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या. दरम्यान आता थेट  बच्चू कडू यांनी याप्रकरणी लक्ष घातल्याने त्यांच्याकडुन न्याय मिळेल अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

..

Bhagwat Udavant

Recent Posts

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

10 minutes ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

23 minutes ago

विंचूर-गोंदेगाव रस्ताकामाला अखेर मुहूर्त!

रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…

34 minutes ago

मेळघाटातील महिलांना उद्योजकतेचे धडे; पारंपरिक कलाकुसरीला नवे कोंद

नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…

46 minutes ago

मनपाची प्रभागरचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार

हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…

52 minutes ago

सिन्नर गोंदेश्वराला फुलांची सजावट

सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…

2 hours ago