दुभाजकाला कार धडकून मनपा कर्मचारी मयूर काळे यांचा मृत्यू
सातपूर: प्रतिनिधी
सातपूर त्र्यंबकेश्वर रोड येथील सकाळ सर्कल येथे रविवारी रात्री झालेल्या अपघातात महानगरपालिकेचा एक कर्मचारी मयुर काळे (वय ४६, यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काळे हे त्रंबक रोड कडून त्यांच्या निवासस्थानी चालले होते त्यात सकाळ सर्कल येथील डिव्हायडर ला चार चाकी वॅग्नर वाहन नंबर MH.15.Jd.0366 धडक दिली. त्यात कर्मचारी काळे हे जखमी झाले होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सकाळ सर्कल परिसरात अनेक अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे नागरिकांनी वारंवार येथे सिग्नल बसवण्याची मागणी देखील केली आहे मात्र अद्यापही सिग्नल बसवण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन देखील दाखल झाले होते.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…