कट कुठलेही असो, त्याला सामोरे जाऊन त्या संकटाशी दोन हात करणारे व यशोशिखरापर्यंत पोहोचणारे दिंडोरी-पेठचे आमदार तथा अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी सीताराम झिरवाळ हे होय. दिंडोरीसह तालुक्याचे विकास नंदनवन करणारे व गोरगरिबांमध्ये मिसळणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नामदार झिरवाळ साहेबांकडे आजही पाहिले जाते. त्यांनी दिंडोरी व पेठ विधानसभा मतदारसंघात तिसर्यांदा निवडून येत इतिहासात रचला आहे, तो त्यांच्या फक्त गोरगरिबांच्या हिताचे कर्तव्य, तसेच लोकप्रियता यामुळेच.
दिंडोरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील वनारे येथील छोट्याशा गावातील सरपंचपदापासून ते तहसीलमधील लिपिक ते थेट मंत्रिपदावर उंच भरारी घेणार्या आमदार झिरवाळ यांची अनोखी कहाणी अतिशय खडतर स्वरूपाची आहे. मंत्री झिरवाळ यांनी आपले शिक्षण वणी व करंजाळी येथे पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथे घेऊन सक्रिय राजकारणात उडी घेतली. त्यांनतर 1984 मध्ये वनारे या गावाचे सरपंच व वारे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व चेअरमन म्हणून निवडून आल्याने राजकारणाची पहिली पायरी चढली होती.
सन 1995 मध्ये दिंडोरी-पेठ मतदारसंघातून त्यांनी जनता दलाकडून उमेदवारी अर्ज भरून आमदारकीची निवडणूक लढवली. मात्र, त्यांना त्यावेळी अपयशाची गोळी गिळावी लागली. सन 1997 मध्ये जनता दलाकडून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येत उपसभापतिपदी त्यांची सार्थ निवड करण्यात आल्याने समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले होते, तसेच सन 1999 पासून त्यांनी जनता दलास ’जय महाराष्ट्र’ करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून दिंडोरी तालुकाध्यक्ष म्हणून ते विराजमान झाले होते. त्यांनतर सन 2002 मध्ये कोशिंबे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आल्यानंतर सन 2004 मध्ये पुन्हा दिंडोरी- पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत विजयश्री खेचून आणत आमदारपदावर विराजमान झाले. सन 2009 मध्ये दिंडोरी लोकसभा निवडणूक लढवत निसटता पराभव होऊन सन 2014 व 2019, 2024 मध्ये आमदारपदी निवडून येत घरोघरी जाऊन मतदारांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता.
मंत्री नरहरी झिरवाळ यांचा जन्म वनारे येथे 1 जून 1959 ला झाला. त्यांचे शिक्षण बारावीपासून महाविद्यालयापर्यंत असून, पुढील शिक्षण करण्यासाठी घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी घरचा उदरनिर्वाह पाहत बिगारीकाम पत्करून दिंडोरी तहसील कार्यालयात काही काळ लिपिक म्हणून कामकाज सांभाळले होते. मात्र, तहसीलमधील लिपिकपदाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने त्यांनी त्या कामास रामराम करीत घरची शेती व इतर कामे पाहत सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या वनारे गावापासून ते दिंडोरी, नाशिकमध्ये कामकाजाचा शिक्का वठवत राजकीय व्यक्तींबरोबर संपर्क ठेवत राजकारणात सक्रिय झाले. तत्कालीन खासदार (कै.) हरिभाऊ महाले यांच्या पावलांवर पाऊल ठेवत राजकीय कारकिर्दीचा मुहूर्त साधला. प्रथमतः मंत्री नरहरी झिरवाळ यांनी वनारे गावचे सरपंच म्हणून मान मिळविला. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी निसटता पराभव पत्करला. त्यानंतर त्यांनी आमदार म्हणून आपले वर्चस्व टिकवून ठेवले ते सन 2024 पर्यंत.
मंत्री झिरवाळ यांचा साधेपणा, तसेच दिंडोरी-पेठ मतदारसंघातील लोकांची विचारपूस, तसेच इतरांची यामुळे त्यांच्या राजकीय पायाभरणीत पाया भक्कम झाला असून, त्यांची साधेपणाची तसेच गोरगरिबांची विचारणा यामुळे त्यांना सरपंचपदापासून ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास गाठता आल्याचे वनारेकर सांगतात. खासकरून आमदार साहेबांच्या टोपीची भुरळही प्रत्येक जनमानसात चर्चेचा विषय ठरला असून, वनारे येथे नागरिकांच्या समस्यांच्या निवारणासाठी साहेबांचा जनता दरबार त्यांच्या घरी भरत असतो.
झिरवाळ यांनी आमदारपासून ते मंत्रिपदाच्या दृष्टिक्षेपात दिंडोरी व पेठ मतदारसंघातील समस्या, तसेच जनतेचे प्रश्न चांगल्यारीतीने मांडण्याचे प्रयत्न करीत त्या सोडवण्याचे वेळोवेळी सूचनाही विविध विभागांना केल्या. त्यात दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करून त्यासाठी शासकीय मंजुरी मिळवली असून, ननाशी परिसरातील नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा मिळावी, या हेतूने ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय व्हावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, तसेच तळेगाव-अक्राळे एमआयडीसी रिलायन्स इंडियन ऑइल आधी कंपन्यांचे कामे प्रगतिपथावर असून, जांबुटके (ता. दिंडोरी) येथील राज्यातील पहिली आदिवासी क्लस्टर औद्योगिक वसाहतीसाठी मंजुरी मिळाली असून, त्याचे काम तत्काळ होणार आहे. त्याचप्रमाणे देवसाने येथील 220 केव्ही वीज केंद्र उभारण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केलेला असून, त्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांसाठी सरकारकडे भरघोस निधीची याचिका नामदार झिरवाळ यांनी केली असून, काही रस्त्यांचे काम पूर्ण झालेले असून, ज्या रस्त्यांचे काम अपूर्ण आहेत त्या रस्त्यांची कामे सिमेंट काँक्रिटीकरण रूपात करण्यात यावीत, अशी मागणीही झिरवाळ यांनी सरकारकडे केलेली आहे. त्र्यंबकेश्वर, उमराळे, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, तसेच नाशिक-दिंडोरी चौपदरीकरण व ओझर विमानतळाला जोडणारे विविध रस्ते यासाठी झिरवाळ यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केलेला आहे.
मांजरपाडा-देवसाने प्रकल्प, विविध वळण योजना, लघुपाटबंधारे यासाठी झिरवाळ साहेबांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून त्यासाठी निधी उपलब्ध करून वळण योजना जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दिंडोरी तालुक्यातील विविध कार्यालय व इमारतींंचे नामदार झिरवाळ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झालेला आहे. त्याचप्रमाणे दिंडोरी शहरात बुद्धविहार, भीमपार्क, कृषी भवन, तसेच दिंडोरी-पेठ मतदारसंघातील क्रीडासंकुल यासाठी ते प्रयत्नशील राहून, ती कामे पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे दिंडोरी-पेठ मतदारसंघातील जनतेकडून त्यांच्यावर कौतुकाची थाप पडलेली असून, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे, या हेतूने दिंडोरी व पेठ येथे अभ्यासिका तयार करून दिल्या आहेत.
दिंडोरी व पेठ येथील नगरपंचायतीसाठी पन्नास कोटींची विकासकामे मंजूर करून दिले आहे. दिंडोरी व इतर ठिकाणी बिबट्याने मोठ्या प्रमाणात हैदोस घातला असून, बिबट्याच्या हल्ल्यांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याअनुषंगाने नामदार झिरवाळ यांनी वन विभागाला सतर्क सूचना देऊन उपाययोजना करण्याच्या आदेश दिले आहेत. त्याबाबत ज्या क्षेत्रात बिबट्याचा वावर आहे तेथे वन विभागाकडून तंत्रज्ञानाचा वापर करत बिबट्यांना जेरबंद करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
अशोक केंग
कॉलेजच्या रंगीत दिवसांची स्टाइल डायरी तरुणींनी कॉलेज कॅम्पसचा लूक सहज, स्टायलिश आणि व्यक्तिमत्त्वसंपन्न ठेवायचा असेल,…
पाऊस दरवर्षीच पडतो; पण प्रत्येकाचा पाऊस निराळा असतो. कुणाला तो बालपणात घेऊन जातो, कुणाला कॉलेजवयीन…
ष्टीच्या आरंभापासूनच मानवाच्या कल्पनाशक्तीला गोंधळात टाकणारे, विस्मयकारी आणि अनंत अशा अंतराळाचे गूढ अजूनही वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा…
निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे,…
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी संततधारेमुळे नाशिकरोड व परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाच ते सहा…
एअरपोर्ट शैलीतील आसनव्यवस्था; प्रतीक्षालयाला नवे रूप नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी भुसावळ विभाग, मध्य रेल्वे यांनी…