महाराष्ट्र

भारताला महासत्ता बनण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही

मुख्यमंत्री : भाजपातर्फे ‘तिरंगा रॅली’; मुख्यमंत्र्यांनी गायले देशभक्तीपर गीत

मुंबई : प्रतिनिधी
भारताच्या प्रगतीचा धसका घेतलेल्या काही परकीय शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्या तरी, भारताला जागतिक महासत्ता होण्यापासून रोखण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही, असा खणखणीत इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईतील वरळी येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ’तिरंगा रॅली’ला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी हा ठाम विश्वास व्यक्त केला.

वरळीत पार पडलेल्या या तिरंगा रॅलीला मुंबईकर आणि कार्यकर्त्यांचा अक्षरशः जनसागर लोटला होता. या देशभक्तीपर वातावरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः माईक हाती घेत ’दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये’ हे गीत गाऊन उपस्थितांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली. या भव्य रॅलीच्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे सर्व प्रमुख नेते विशेषत्वाने उपस्थित होते.

नागरिकांचा ’तिरंगा महासागर’

उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला अथांग सागर आणि दुसर्‍या बाजूला उसळलेला नागरिकांचा ’तिरंगा महासागर’ असे समर्पक वर्णन करत उपस्थितांची दाद मिळवली. आज भारत जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला असून, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अवकाश संशोधनात भारताने ऐतिहासिक झेप घेतली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश अशी ओळख निर्माण केलेल्या भारताची सर्वाधिक तरुण लोकसंख्या हीच खरी ऊर्जा असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

’ऐ वतन तेरे लिये’ मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल
भाषणापूर्वी ’दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये’ हे प्रसिद्ध गाणे सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अचानक हातात माईक घेतला हे गाणे गाण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांचा हा अंदाज पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली. त्यांच्या या गीतगायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

No one will be able to stop India from becoming a superpower.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

‘तो’ दबक्या पावलांनी आला अन् कुत्र्याला उचलून पसार झाला!

चांदवडच्या मुलींच्या वसतिगृहात बिबट्याचा शिरकाव चांदवड : वार्ताहर येथील ऐतिहासिक कालिकादेवी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या शासकीय…

26 seconds ago

दागिने बळकावणारा तोतया डेप्युटी मॅनेजर गजाआड

महिला साथीदारही अटकेत; उपनगर पोलिसांत गुन्हा नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी फायनान्स कंपनीत डेप्युटी मॅनेजर असल्याची…

8 minutes ago

कर्करोग हा अधिसूचित आजार घोषित करा

सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश; देशभरात एकसमान आरोग्य धोरण असावे नवी दिल्ली : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने…

20 minutes ago

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हा पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना ‘हर घर तिरंगा’…

25 minutes ago

‘समाजकार्य’ला स्वतंत्र विद्याशाखेची मान्यता

मंत्रिमंडळाचा निर्णय : शिक्षण, ऊर्जा क्षेत्राला चालना मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

36 minutes ago

राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

नवी दिल्ली : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील ‘येवला पैठणी’ला आता…

41 minutes ago