संकलन :अश्विनी पांडे
प्रत्येक मुलाचे आणि वडिलांचे नाते वेगळे असते. माझ्या आणि आबांच्या नात्यात चार पदर आहेत. ते माझे वडिल, गुरू, मार्गदर्शक,मित्र आणि समिक्षक आहेत. आयुष्यातील महत्त्वपूर्ण निर्णयात त्यांचे मार्गदर्शन लाभते. आमचे नाते मैत्रिपूर्ण असल्याने त्यांच्याशी मनमोकळा संवाद होतो. त्यांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मी अभिनेता होऊ शकलो. आबांनी लहानपणापासूनच माझ्यातील निर्णयक्षमता गुण विकसित व्हावा म्हणून प्रोत्साहन दिले. महाविद्यालयात असताना आबा माझे नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी येत असत. आणि सभागृहाच्या शेवटच्या रांगेत बसत होते. मात्र एका प्रयोगाला प्रयोग संपल्यानंतर आणि प्रेक्षक निघुन गेल्यावर ही आबा बसून होते. हीच माझ्यासाठी चांगल्या अभिनयाची पावती होती. वडिल ही आयुष्यातील महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. प्रत्येकाचे वडिल हे खरे हिरो आहेत. प्रत्येकांनी आपल्या वडिलांमधील हिरो ओळखावा.
अभिनेता चिन्मय उदगिरकर