बिनविरोध निवडीच्या पार्श्वभूमीवर जनहित याचिका दाखल

मुंबई :
बिनविरोध निवडीमुळे मतदारांचा ‘नोटा’ हा महत्त्वाचा पर्याय हिरावला जात असल्याचा गंभीर मुद्दा आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. ईव्हीएमवर उपलब्ध असलेल्या ‘वरीलपैकी कोणीही नाही’ या पर्यायाची योग्य अंमलबजावणी व्हावी, तसेच मतदारांना आपला विरोध नोंदवण्याचा अधिकार मिळावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सार्वजनिक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास वानखेडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना मंगळवारी लेखी सबमिशन सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, 27 जानेवारी रोजी होणार्‍या पुढील सुनावणीपर्यंत सविस्तर नोट्स दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
याचिकेमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया न राबवता उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले जाते. त्यामुळे मतदारांना मतदानाचा तसेच ‘नोटा’चा पर्याय निवडण्याचा घटनात्मक अधिकार मिळत नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
‘नोटा’ हा केवळ बटण नसून, लोकशाहीतील असंतोष व्यक्त करण्याचे साधन आहे. मात्र, बिनविरोध निवडींमुळे मतदारांना हा अधिकारच नाकारला जातो. हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारे आहे, असा दावा याचिकेमध्ये करण्यात
आला आहे.
विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विविध सहकारी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडी होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत मतदारांना कोणताही पर्याय न देता उमेदवार थेट विजयी घोषित केले जात असल्याने ‘नोटा’चा उद्देशच संपुष्टात येतो, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या याचिकेमुळे बिनविरोध निवडीची पद्धत, मतदारांचे अधिकार आणि ‘नोटा’च्या अंमलबजावणीबाबत नव्याने कायदेशीर चर्चा सुरू झाली आहे. पुढील सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे.

NOTA issue in the High Court

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago