पंढरीची वारी पूर्ण करी लालपरी
नाशिक ः प्रतिनिधी
एस.टी कडून आषाढीवारीसाठी ग्रुप बुकिंग आणि आरक्षणही उपलब्ध
आषाढीवारीसाठी ग्रुप बुकिंग आणि आरक्षणाची सोयही उपलब्ध करण्यात आली आहे.ग्रुप बुकिंगसाठी 45 जणांचा समूह असल्यास थेट आपल्या गावातून पंढरपुरासाठी जाण्यासाठी भाविकांना आरक्षण करता येणार आहे.त्यासाठी आगारप्रमुखांशी संपर्क करून कळविण्याचे आवाहन राज्य परिवहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
एका गावातील एकत्रीत भाविकांना पंढरपूर यात्रेसाठी जाणार असल्यास ग्रुप बुकिंग आणि आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांना आपल्या गावातूनच थेट पंढरपुरास प्रस्थान करणे सुलभ होणार आहे.
नाशिक एक आणि दोन,मालेगाव,सटाणा,मनमाड, सिन्नर,लासलगाव,नांदगाव, इगतपुरी,येवला कळवण, पेठ, पिंपळगाव येथील आगार प्रमुखांशी संपर्क करण्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
आषाढीवारीसाठी पंढरपूरात भाविकांना जाण्या-येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या नाशिक विभागाच्या विविध आगारातून बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी पंढरपूर यात्रा 6 ते 14 जुलै या कालावधीत भरणार आहे.यानिमित्ताने आगाराच्या कक्षेत पंढरपूर येथे जाणार्या आणि येणार्या यात्रेकरूंसाठी बसेस सोडण्यात येणार असल्याचे विभागामार्ङ्गत कळविण्यात आले आहे.