नाशिक

नायलॉन मांजा विक्री, वापर करणारे रडारवर

सिन्नर न.प.कडून नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे आवाहन

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नगरपरिषदेने नायलॉन मांजा विक्री व वापर करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री आणि वापर होतो. नगरपरिषदेने याला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथकांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात तपासणी अभियान सुरू केले आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणार्‍या जीवितहानीपासून नागरिक, पक्षी आणि प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी नगरपरिषदेकडून जनजागृती मोहीम राबवली
जात आहे. नायलॉन मांजा अथवा चायनीज मांजा अत्यंत धारदार व धोकादायक असल्याने त्याचा वापर केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. मागील काही वर्षांमध्ये या मांजामुळे अनेक पक्ष्यांचे मृत्यू, नागरिकांचे गळे व इतर शारीरिक अवयव चिरले जाणे, दुचाकीस्वारांचे अपघात, विद्युत वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन आग लागणे किंवा पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळेच उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या आदेशानुसार सिन्नर न.प.कडून कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात
आले आहेत.

सुती मांजाचा वापर करावा

पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापर न करता सुती किंवा कापडी मांजा, पर्यावरणपूरक दोर्‍यांचा वापर करण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. नायलॉन मांजाचा वापर अथवा चोरून विक्री होत असल्यास नागरिकांनी नगरपरिषद किंवा पोलिसांना माहिती द्यावी. आपले जीवित रक्षण आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी नायलॉन मांजाचा वापर टाळावा, असे नगरपरिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नायलॉन मांजा वापरताना आढळले तरी कारवाई

घाऊक किंवा किरकोळ विक्रेते नायलॉन मांजा विकताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. एखाद्या व्यापार्‍यांकडे नायलॉन मांजाचा साठा आढळल्यास जप्ती व दंड ठोठावण्यात येईल. एखादा नागरिक नायलॉन मांजाने पतंग उडवत असल्यास पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 अंतर्गत कडक कारवाई केली जाईल. – अभिजित कदम, मुख्याधिकारी

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago