महाराष्ट्र

टाकेद-कावनईला भाविकांचा महासागर

महाशिवरात्रीनिमित्त लाखोंनी घेतला स्नान-दर्शनाचा लाभ

घोटी : प्रतिनिधी
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद व श्रीक्षेत्र कावनई येथे भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली होती. ‘हर हर महादेव’ व ‘बम बम भोले’च्या जयघोषाने दोन्ही तीर्थक्षेत्रांचा परिसर दिवसभर दुमदुमून गेला. टाकेद येथे एक लाखाहून अधिक भाविकांनी स्नान व दर्शनाचा लाभ घेतला, तर कावनई येथे सुमारे 80 ते 90 हजार भाविक उपस्थित होते. दिवसभर गर्दीचा ओघ कायम राहून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या.
सोहळ्यासाठी विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. घोटी, भावली, शुक्लतीर्थ तसेच परिसरातील अन्य शिवमंदिरांमध्येही दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली. कावनई येथे भाविकांसाठी सुमारे 20 क्विंटल खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. ट्रस्टतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; मात्र तरीही चोरीच्या काही घटना घडल्याची चर्चा भाविकांमध्ये होती. यात्रेनिमित्त राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसफेर्‍यांचे नियोजन केले होते. इगतपुरी, सिन्नर, अकोले, येवला व नाशिक आगारांतून विशेष बसेस सोडण्यात आल्या. घोटी-इगतपुरी-टाकेद मार्गावर दिवसभरात सुमारे 60
फेर्‍या झाल्याची माहिती वाहतूक निरीक्षक कैलास नाठे यांनी दिली. तसेच इगतपुरी आगारात तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले होते. यात्रेमुळे स्थानिक व्यावसायिकांना चांगली उलाढाल झाली असून, लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने यंदा अपेक्षित तितकी गर्दी नसल्याचेही काहींचे मत होते. दरवर्षी चार ते पाच लाख भाविक येथे येतात, असे स्थानिकांचे
म्हणणे आहे.
वाहनतळाची अपुरी व्यवस्था, रस्त्यावर अनियमित पार्किंग तसेच खिसेकापूंच्या तक्रारी अशा काही अडचणी यावेळी जाणवल्या. दुचाकीसाठी 50 रुपये व चारचाकीसाठी 100 ते 200 रुपये पार्किंग शुल्क आकारले जात असल्याबाबत काही भाविकांनी नाराजी व्यक्त केली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. दरम्यान, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कावनई येथे दिवसभरात सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती विश्वस्त कुलदीप चौधरी यांनी दिली. दोन-तीन ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते. टिटोली येथील लिंगेश्वर महादेव मंदिरात दिवसभर भजन व रात्री कीर्तन कार्यक्रम पार पडला, तर कुशेगाव-किशकिंधानगरी येथेही विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले. श्री कपिल महामुनी आश्रम व लाइफलाइन ब्लड कॅम्प यांच्या वतीने श्रद्धा रावल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. विविध महंत, विश्वस्त व स्वयंसेवकांनी यात्रेचे नियोजन व सेवाकार्यात सहभाग नोंदविला.

Ocean of devotees at Takeda-Kavanai

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago