बनावट ॲाईल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई

लासलगाव प्रतिनिधी

लासलगाव व विंचुर येथे कॅस्ट्रोल कंपनीचे बनावट ॲाईल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर लासलगाव पोलीसांनी कारवाई केली असल्याची माहिती  सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात फरमान कबीर हसन राहणार उद्योग विहार गुरगाव,राज्य हरियाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात भा द वि कलम अंतर्गत इम्तियाज इसाक काजी राहणार पिंपळगाव नजीक,मनीष अशोकराव खुटे राहणार पिंपळगाव नजीक,निलेश भीम शर्मा राहणार लासलगाव तसेच संतोष जगन्नाथ राऊत राहणार विंचूर तालुका निफाड हे कॅस्ट्रॉल कंपनीचे डुप्लिकेट ऑइल विकत
असल्याची फिर्यादी दिल्याने या सर्व व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून 19,691 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लासलगाव पोलिस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे,पोलीस हवलदार कैलास महाजन, संदीप शिंदे,प्रदीप आजगे,सागर आरोटे,सुजय बारगळ, कैलास मानकर व देविदास पानसरे यांच्या पथकाने कारवाई केली.

Bhagwat Udavant

Recent Posts

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

7 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

11 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

11 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

12 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

12 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

12 hours ago