खाद्यतेल आणखी महागणार!

खाद्यतेल आणखी महागणार!
सध्या भारताची खाद्य तेलाची गरज 230 लाख टन्स एवढी आहे . त्यापैकी भारत 130 ते 150 लाख टन्स तेल आयात करतो . त्यापैकी 70 टक्के तेल पामतेल आयात होते . या पामतेलात 60 टक्के वाटा इंडोनेशिया देशाचा व उर्वरित 40 टक्के मलेशिया देशाकडून आयात होतो . सध्या आलेल्या बातम्यांनुसार इंडोनेशिया देशात पाम तेलाची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे . त्यांनी निर्यातीवर बंदी घातलेली आहे . त्याचा परिणाम भारतावर होणार आहे . मध्यंतरी भारतात खाद्य तेलाचे भाव वाढले होते . आता ते परत वाढू शकतील ही शक्यता आहे . भारतीय खाद्य तेल संघाने सरकारला या भाववाढीबद्दल काही सूचना केल्या होत्या पण अजून सरकारने यावर विचार केला नाही . असे कळते .भारतात खाद्य तेल निर्मितीचे काही मार्ग काढून त्यावर विचार करावा लागेल . अर्थात युक्रेन व रशिया युद्ध किती काळ राहणार व त्याचे परिणाम जगावर कित्ती वेळ होणार हे आजतरी कोणी निश्चित पणे सांगू शकत नाही अगोदरच डिझेल व पेट्रोल या वाढीमुळे अनेक वस्तूंच्या किमती वाढत चालल्या आहेत . त्यात आता पाम तेलाची म्हणजेच खाद्य तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
– शांताराम वाघ पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *