उमेदवारांकडून मतदार आणि कार्यकर्त्यांसाठी ओली-सुकी पार्टी

सातपूर : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना मतदारांना प्रलोभने आणि आमिषे दाखविण्याची उमेदवारांची जणू स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र सातपूरमधील अनेक भागांत दिसत आहे. जिकडेतिकडे ओल्या पार्ट्यांची चंगळ सुरू आहे.
मतदारांना आमिष देणे आणि प्रलोभने दाखविणे कायदेशीर गुन्हा असल्याचे सुज्ञ मतदार आणि उमेदवार या दोघांनाही माहिती असताना देण्या-घेण्यासाठी दोघांचीही मोठी तगमग सुरू आहे. अशाच काहीशा घटना सातपूर विभागात घडल्या आहेत. मात्र, प्रचाराला अवघे काही दिवस उरल्याने अनेक उमेदवारांनी प्रचाराऐवजी वाटपावर भर दिला आहे. काहींनी थेट वाटपासाठी सर्वांत सुरक्षित म्हणून रात्रीची व पहाटेची वेळ निवडली आहे.
मतदारांना काही दिवसांआधीच छुप्या पद्धतीने वाटप सुरू आहे. मतदारांना अगदी निर्जनस्थळी आणि सहजासहजी कोणाला पोहोचता येणार नाही अशा ठिकाणी कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून मतदारांच्या संख्येनुसा घेण्यासाठी परिसरातील एका व्यक्तीला बोलावतात. तो एकटाच आला आहे का, आपल्याला मतदान करेल का, याची खात्री करूनच व त्याला देवतांची शपथ दिली जाते.
मतदारही ’अभी नहीं तो कभी नहीं’ असे म्हणत पदरात पडलेल्या पार्टीचा आनंद घेत असतो. जसा अंधार पडू लागतो तसा ओल्या पार्टीसह सुक्या पार्टीला वेग येतो.

Oli-Suki party for voters and workers from candidates

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *