महाराष्ट्र

निकाल बाजूने लावून देण्याची ओमराजे यांना ऑफर

संजय राऊतांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली । प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सरकारी हस्तक्षेप, यंत्रणांचा गैरवापर, न्यायव्यवस्थेतील निःपक्ष धोरण आणि राजकीय दबावाबाबत अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप केले आहेत. ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर असलेल्या राजकीय दबावाचा धक्कादायक खुलासा केला आहे. राऊत यांच्या दाव्यानुसार, ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्या वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) हत्या प्रकरणाचा निकाल स्वतःच्या बाजूने हवा असल्यास पक्ष बदलून सत्ताधार्‍यांसोबत येण्याची खुली ऑफर देण्यात आली. या आरोपामुळे देशभरातील सत्ता वर्तुळात सुरू असलेल्या कुजबुजीला आता थेट सार्वजनिक व्यासपीठावर वाचा फुटली आहे.
गेल्या वीस वर्षांपासून पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा खटला विशेष सीबीआय न्यायालयात सुरू असून, या प्रकरणाचा बहुप्रतीक्षित निकाल नुकताच लागणे अपेक्षित होते. मात्र, निकालपत्र पूर्ण न झाल्याचे कारण देत न्यायालयाने हा निकाल पुढे ढकलला आहे. संजय राऊत यांनी असा थेट आरोप केला आहे की, न्यायालयाचा निकाल तुमच्या बाजूने लावूनदेतो, फक्त तुम्ही स्वाक्षरी करा आणि आमच्या गटात सामील व्हा, असा निरोप ओमराजे निंबाळकर यांना एका व्यक्तीमार्फत देण्यात आला. एका खासदाराला आपल्या पक्षात ओढण्यासाठी थेट सीबीआय न्यायालयाच्या निकालाचा वापर आमिष आणि दबाव म्हणून केला जात असल्याचा हा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे. या धक्कादायक गौप्यस्फोटानंतर देशभरातून यावर अत्यंत चिंताजनक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर संजय राऊत यांचा हा दावा खरा असेल, तर देशातील न्यायव्यवस्था खरोखरच स्वतंत्र राहिली आहे का, आणि न्यायालयाचे निकाल आता राजकीय पक्षनिष्ठेवर ठरवले जात आहेत का, असा संतप्त सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. सत्तेचा गैरवापर करून सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणा आणि थेट न्यायालयांवर राजकीय दबाव आणण्याचा हा प्रकार लोकशाही व संविधानासाठी अत्यंत घातक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

 

Omraje offered a deal to secure a favorable outcome.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago