नाशिक

नाशिक विधान परिषदेसाठी आज मतदान

गुप्त पद्धतीच्या मतदानामुळे धास्ती कायम

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक विधान परिषदेसाठी आज, गुरुवारी (दि.18) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, महायुतीचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांच्यासमोरील अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी गेल्या आठवड्यातच प्रचार थांबवण्याचा निर्णय झाला. मात्र, तरीही शिंदेसेनेत अस्वस्थता असून, त्या भीतीतूनच नाशिकमधून महायुतीच्या मतदारांना ठाण्याला हलवण्यात आले आहे. एकूण 619 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या रणांगणातून अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी याआधीच प्रचार थांबवला. गिते यांनी माघार घ्यावी, याकरिता महायुतीचे मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी नाशकात तळ ठोकत गिते यांची माघारी करून घेतली. यानंतर दराडेंसमोरील आव्हान संपुष्टात येईल अशी चर्चा होती, पण गिते यांनी फक्त माघार घेतली. समर्थन न दिल्याने शिंदेसेनेने कुठलाही दगाफटका नको म्हणून महायुतीच्या मतदारांना थेट ठाण्याला नेण्यात आले.
दरम्यान, गिते उघडपणे कुठेही प्रचार करताना दिसत नसून त्यांनी प्रचार थांबवला आहे. मात्र, असे असतानाही शिंदेसेनेच्या नेत्यांकडून काळजी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.

गोपनीय पद्धतीमुळे चलबिचल
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) देत शिंदेसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे निर्देश दिले आहेत. याचप्रमाणे शिंदेसेनेने स्वपक्षाच्या नगरसेवकांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मतदारांना महायुतीला मतदान करण्याच्या सूचना आधीच केल्या आहेत. मात्र, सदरची मतदानप्रक्रिया गोपनीय असल्याने मतदारच ठरवेल की तो कोणासाठी मतदान करेल. यामुळे शिंदेसेनेत चलबिचल असल्याचे समजते आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला
नाशिक विधान परिषदेची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. गोकुळ गिते यांच्या माघारीची जबाबदारी त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवली होती. याशिवाय शिंदे यांनी गिते यांच्याशी स्वत: चर्चा केल्याचे सांगण्यात आले. नाशिक लोकसभेत पराभव झाल्यानंतर शिंदेसेनेला विधान परिषदेत कुठलाही दगाफटका नको आहे, याकरिता कमालीची खबरदारी घेतल्याचे दिसते.

 

Voting for the Nashik Legislative Council today.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

12 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

12 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

12 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

12 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago