सिडको ः विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्तमनगर, सिडको येथील माणिक हाइट्स या अपार्टमेंटमध्ये राहणारे राजेंद्र सुरेश जाधव (वय 57) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पाण्याची टाकी पाहणी करत असताना ते तिसर्या मजल्यावरून खाली कोसळले. यात त्यांचा तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
राजेंद्र जाधव हे त्यांच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर पाण्याच्या टाकीचा पाइप नादुरुस्त झाल्याने पाहणी करण्यासाठी गेले होते. पाहणी करत असताना त्यांचा तोल जाऊन ते थेट खाली कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मयत राजेंद्र जाधव यांचे माणिक हाइट्स इमारतीत मेडिकल दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…
मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…