दोधेश्वर घाटात ट्रॅक्टर उलटून एकाचा मृत्यू ४० हुन अधिक विद्यार्थी जखमी
सटाणा:- गणेश सोनवणे
बागलाण तालुक्यातील दोधेश्वर तीर्थस्थळावर श्रावणी सोमवारच्या गर्दीवर यंत्रण ठेवण्यासाठी बागलाण ॲकेडमी मधील ४० हुन अधिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते. दोधेश्वर घाटात ट्रँक्टर उलटून ४० हुन अधिक विद्यार्थी जखमी झालेत तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दोधेश्वर तीर्थस्थळावर भावीकांची मोठी गर्दी होत असते. गर्दी नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीकोनातून पोलिस बंदोबस्तासह बागलान ॲकेडमीच्या सैनिक व पोलीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना दोधेश्वर मंदीराच्या वतीने सालाबादाप्रमाणे बंदोबस्तासाठी पाचारण केले होते.दिवसभर सुरक्षा व्यवस्था आटोपुन विद्यार्थी ट्रॅक्टर मधून ५ वाजेच्या सुमारास सटाण्याकडे निघाले असता दोधेश्वर घाटातील पहिल्या वळणाला ट्रँक्टर पल्टी झाला . ट्रॅक्टर मधील विद्यार्थी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांवर आदळले गेल्याने जखमी झालेत तर ट्रॅक्टर उलटल्यानंतर समोरून येणारी इंडीगो गाडी ट्रँक्टर वर आदळली. अपघाताचे वृत्त सटाणा शहरात येऊन धडकताच शहरातील विविध सामाजिक संघटना व तरूणांनी मिळेल ती वाहणे व रूग्ण वाहिका घेऊन दोधेश्वर घाटाकडे धाव घेतली.
जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ इतर वाहणे व रूग्णवाहिके मधून सटाणा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. यावेळी दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचा-यांनी कोणताही विलंब न करता उपचार सुरू केले. गंभीर जखमी विद्यार्थ्यांना शहरातील खाजगी ॲपेक्स व सिम्स रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचे वृत्त समजताच आमदार दिलीप बोरसे व ॲकेडमीचे संचालक आनंदा महाले रूग्णालयात दाखल झाले. बागलाण ॲकेडमी मध्ये सैनिकी व पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी १८ ते २३ वयोगटापुढील असुन ते नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर , जिल्ह्यातील असून त्यांच्या पालकांना अपघाताचे वृत्त कळविले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून त्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे नाव निलेश बापु कन्होरे वय २३ रा. निमशेवडी ता.नांदगांव असे आहे. अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, वर्षा जाधव व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मालेगाव ग्रामीणचे पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांनी रूग्णालयात येऊन रूग्णांची विचारपुस केली.
ट्रँक्टर उलटल्यानंतर विद्यार्थी रस्त्याच्या कडेवरील दगडांवर आदळले गेल्याने २० हुन अधिक विद्यार्थी गंभीर रीत्या जखमी झालेत त्यांच्यावर ॲपेक्स हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत
जखमीची नावे :
प्रदीप कसदेकर, मयूर वाघ, तेजस दादाजी चव्हाण, सचिन अनिल शिंदे, विशाल रवींद्र निकम, महेश सुनील जाधव, रोहित भाऊसाहेब गायकर, निलेश पाटील, अभिषेक तानाजी पगार, यश संजय पगार, कल्पेश पोपट सानप, प्रथमेश संतोष वाकळे, गौरव सुकळे, विजय श्रावण अहिरे, उमेश दगा अहिरे, पवन माने, राहुल भोये, रोहन माने, प्रवीण पांडुरंग करवाटे, उदय राजू अहिरे, ज्ञानेश्वर राजेंद्र भामरे, विशाल जाधव, सुजल अंकुर पवार, सागर लक्ष्मण धोत्रे, योगेश अनिल शिंदे, चरणसिंग महेंद्रसिंग महाले, हेमंत अहिरे, राहुल फकीरा दहिने, आसिफ जगन पिंपळसे, यश खत्री, माधव पुंजाराम गवळी, सागर प्रकाश भवर, उमेश मच्छिंद्र पाटील, राहुल फकीरा इंगळे, गणूराम कसदेकर, हर्षल साळुंखे, अमित ज्ञानेश्वर जगताप, अनिकेत गाढवे, तुषार अहिरे, पवन पाटील, मोहित राजेंद्र येवला, ऋषिकेश पानसरे यांचा समावेश आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…