नाशिक

सोमवारपासून निफाड उपबाजार समितीत कांदा लिलाव सुरू होणार

लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्याची लासलगावकरांची आर्त हाक

लासलगाव:समीर पठाण

लासलगाव बाजार समितीची उपबाजार समिती असलेल्या निफाड उपबाजार आवारामध्ये कांद्याचे लिलाव उद्या सोमवार दि २ ऑक्टोंबर पासून पुन्हा सुरू होत असल्याची माहिती लासलगाव बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.गेल्या बारा दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या बंदमुळे हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

दि.२८ सप्टेंबर २३ रोजी विंचूर उपबाजार आवारावरील कांदा लिलाव हे पूर्ववत सुरू झाले असून आता उद्या पासून निफाड उपबाजार आवारात देखील कांद्याचे लिलाव सुरू होणार आहे मात्र लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कांदा आवारावर कांद्याचे लिलाव केव्हा सुरू होतील या कडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह लासलगावकरांचे लक्ष लागले आहे

गेल्या बारा दिवसांपासून लासलगाव बाजार समिती  बंद असल्यामुळे शहरातील छोटे मोठे व्यवसाय पूर्णपने ठप्प झाले आहे तसेच छोट्या टपरी धारकांचा व्यवसाय हा पूर्ण बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांवर अवलंबून आहे असे टपरी धारक सुध्दा आर्थिक संकटात सापडले आहे.रोजंदारी करणाऱ्यांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे.लासलगाव येथील कांदा व्यापारी व गावकऱ्यांनी याबाबत एकत्रित बैठक घेऊन समन्व्य साधून लासलगाव बाजार समितीत बंद असलेले कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी लासलगावकरांनी केली आहे

दरम्यान सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्यास लिलाव सुरू करण्याची तयारी कांदा व्यापाऱ्यांनी यांनी दर्शवली आहे.मात्र,सरकार सध्या व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करत नसल्याचे दिसून येत आहे.जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत लिलाव सुरू करणार नाही असे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे

Ashvini Pande

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago