अवकाळीमुळे उघड्यावरील कांदा भिजला, भरपाईची मागणी
डांगसौंदाणे : प्रतिनिधी
डांगसौंदाणे व परिसरात संततधार पडणार्या बिगरमोसमी पावसामुळे शेतकर्यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांचा कांदा शेतात तसाच उभा आहे. त्यामुळे शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, अशी मागणी
डांगसौंदाणे परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
येथील दिगंबर बोरसे, शंकर सोनवणे, सुभाष केदा पवार, निवृत्ती बाबुराव सोनवणे या शेतकर्यांचा कांदा काढून शेतातच उघड्यावर पडला आहे. काही शेतकर्यांचा कांदा चाळीत भरल्यानंतर चाळीचे पत्रे उडाले आहेत. शिवाजी केदा खैरनार, निवृत्ती भागा सोनवणे, बाळू केदा सोनवणे, सोपान भागा सोनवणे अशोक गणपत गांगुर्डे, भाऊसाहेब केदा सोनवणे, बाजीराव गांगुर्डे, बाबूराव सुपडू बोरसे, पंढरीनाथ सुखदेव बोरसे, रामदास शंकर सोनवणे, जिजाबाई शंकर सोनवणे, राजेंद्र शंकर सोनवणे, जगदीश शंकर सोनवणे, विमलबाई दिगंबर बोरसे, हेमंत भाऊराव अहिरे, श्रीराम उखा सोनवणे, नितीन भाऊराव आहिरे, बापू उखा सोनवणे, दिनेश जगन्नाथ सोनवणे, धर्मा लक्ष्मण पगारे, दत्तात्रेय लक्ष्मण पगारे, रामदास काशीराम सोनवने आदी शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेला घास या बेमोसमी पावसाने हिरावून घेतला आहे. बांधावर जाऊन पंचनामे करून तत्काळ योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लवकरच कांद्याचे पंचनामे करून सादर करण्यात येतील, असे ग्रामसेवक बोरसे यांनी सांगितले. डांगसौंदाणेचेे ग्रामसेवक बोरसे यांना गावाच्या पंचनाम्यासाठी नेमण्यात आले आहे. लवकर ते पंचनाम्याचा अहवाल आम्हाला सादर करतील, असे तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी सांगितले.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…