नाशिक

चांदवडमध्ये कांदा-मकाप्रश्नी आंदोलनाचा वणवा

मुंबई-आग्रा महामार्ग रोखला; मंत्री भुसे यांच्या शिष्टाईनंतर उपोषण मागे

चांदवड ः वार्ताहर
कांदा आणि मका पिकाला योग्य हमीभाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने गुरुवारी रौद्र रूप धारण केले. प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकरी आणि उपोषणकर्त्यांनी सकाळी साडेदहा ते साडेअकरादरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
महामार्ग रोखल्याची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली. प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, मात्र महामार्ग रिकामा केल्यानंतरही शेतकरी पुन्हा उपोषणाच्या ठिकाणी जाऊन ठिय्या मांडून बसले. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते.
डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी आकडेवारीसह वस्तुस्थिती मांडली. ते म्हणाले की, “गेल्या दोन महिन्यात नाशिक जिल्ह्यातून 80 लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. मात्र, भावात मोठी घसरण झाल्याने एकट्या जिल्ह्याचे 800 कोटींचे नुकसान झाले आहे. कांद्याचा उत्पादन खर्च 20 रुपये किलो असताना शेतकरी 6-7 रुपयांनी कांदा विकत आहे. ही परिस्थिती चिंताजनक असून, शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे.” डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी सरकारवर टीकास्त्र सोडताना लाडकी बहीण योजनेचा दाखला दिला. काही राजकीय वर्तुळातून या आंदोलनाला निवडणुकीशी जोडले जात असल्याचा निषेध माजी सभापती संजय जाधव यांनी केला. चांदवड बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. आत्माराम कुंभार्डे, संजय जाधव, विलास भवर, संपतराव वक्ते, विजय जाधव, भिमराव जेजुरे, समाधान जामदार, अनिल ठोके, दशरथ ठाकरे आणि संदीप चव्हाण हे अकरा आंदोलक उपोषणाला बसले होते. उपोषणकर्ते विलास भवर यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र “घरी फाशी घेण्यापेक्षा सरकारच्या दारात मरण आलेलं बरं” असे म्हणत त्यांनी उपचार नाकारून पुन्हा उपोषणस्थळ गाठले.

‘कांदा आणि मका उत्पादक शेतकर्‍यांच्या भावनांशी शासन पूर्णपणे सहमत आहे. मका खरेदीचा कोटा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. कांद्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष समिती गठित केली आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत येत्या चार दिवसांत मुंबईत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.’
– दादा भुसे, मंत्री, महाराष्ट्र राज्य

Onion-maize issue stirs up agitation in Chandwad

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago