नाशिक

बोलठाण उपबाजारासमोर ‘रास्ता रोको’

लिलावानंतर मक्याचे दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

बोलठाण : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील बोलठाण उपबाजारात मका लिलावात कमी भाव मिळत असल्याने संतप्त शेतकर्‍यांनी उपबाजारासमोर रास्ता रोको केला. तब्बल दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.
बोलठाण उपबाजारात एका शेतकर्‍याच्या मका मालाची 1562 रुपये प्रतिक्विंटलने लिलाव केला; परंतु त्या शेतकर्‍याची प्रत्यक्षात 1520 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली. याप्रकरणी सदर शेतकर्‍याच्या नुकसानीला प्रशासन व व्यापारी जबाबदार असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. बोलठाण उपबाजार समितीसमोर शेतकर्‍यांनी तीव्र रास्ता रोको केला. तसेच कांदा दरही कोसळत सहाशेपेक्षाही दर कमी मिळाल्याने उपबाजारात अनेक कांदा उत्पादक शेतकरीही रास्ता रोकोत सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलकांनी मका व कांद्याच्या ट्रॅक्टरवर उभे राहून रास्ता रोको आंदोलन केले. प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, उपाध्यक्ष जनार्दन भागवत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश बोरसे यांनी उपस्थितांना संबोधित करताना केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी पोलीस हवालदार भास्कर बस्ते यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. मंडळ अधिकारी भाऊसाहेब चौधरी यांनी उपस्थित राहून शेतकरी व व्यापारी यांच्यासह
सुसंवाद साधला. अखेर बाजार समिती संचालक गोकुळ कोठारी यांच्या मध्यस्थीतून शेतकर्‍याला मकाचे भाव (1600 रुपये प्रतिक्विंटल) वाढवून मिळाल्यानंतर रास्ता रोको मागे घेतला. व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय साधण्यासाठी गोकुळ कोठारी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या भूमिकेने तब्बल दोन तासांनी वाहतूक मार्ग सुरळीत झाला.

‘Roadblock’ in front of Bolthan sub-market

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago