लाखोंंचे नुकसान, लासलगावला दीड तासात 67 मिलिमीटर पावसाची नोंद
लासलगाव : वार्ताहर
कांदानगरी अर्थात लासलगाव येथे सोमवारी (दि. 26) वादळी वार्यासह अवकाळी पावसाने सायंंकाळी जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे येथील एका कांदा व्यापार्याचे शेड जमीनदोस्त झाले, तसेच दोन कांदा व्यापार्यांच्या शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कांद्याचे लाखोंचे नुकसान झाले.
वादळासह पावसामुळे अनेक झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली, तसेच शहरातील अनेक दुकानांसह घरांत पावसाचे पाणी शिरले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने शहरातील वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित झाला. दरम्यान, दीड तासाच्या कालावधीत 67 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वादळी वार्यासह जोरदार पावसाने शहरात सुमारे दीड तास हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे टाकळी फाट्याजवळ असलेल्या कांदा व्यापारी मनोज जैन यांचे अंदाजे सात लाखांचे शेड जमीनदोस्त झाले. तसेच अंदाजे पंधरा लाखांचा कांदा पाण्यात भिजून खराब झाला. नवीन कांदा मार्केटजवळ असलेल्या आनंदा गिते यांच्या कांदा शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने सुमारे दोन लाख रुपयांचा कांदा पाण्यात भिजून खराब झाला. कोटमगाव रोडवरील राजू मुनोत यांच्या शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अंदाजे दहा लाख रुपयांचा कांदा पाण्यात भिजून खराब झाला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लासलगावसह परिसरातील गावांत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कांद्याचे शेड पडले आणि कांदा खराब झाला. त्यामुळे शेतकर्यांसह कांदा व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा शेतातच सडत आहे, तर काही ठिकाणी कांद्याचे दरही पडले आहेत. महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्यांसह व्यापार्यांनी केली आहे.
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…
फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला शहापूर : साजिद शेख एका…
अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…
उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…