नाशिक

वादळासह अवकाळी पावसाने कांद्याचे शेड जमीनदोस्त

लाखोंंचे नुकसान, लासलगावला दीड तासात 67 मिलिमीटर पावसाची नोंद

लासलगाव : वार्ताहर
कांदानगरी अर्थात लासलगाव येथे सोमवारी (दि. 26) वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने सायंंकाळी जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे येथील एका कांदा व्यापार्‍याचे शेड जमीनदोस्त झाले, तसेच दोन कांदा व्यापार्‍यांच्या शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कांद्याचे लाखोंचे नुकसान झाले.
वादळासह पावसामुळे अनेक झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली, तसेच शहरातील अनेक दुकानांसह घरांत पावसाचे पाणी शिरले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने शहरातील वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित झाला. दरम्यान, दीड तासाच्या कालावधीत 67 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने शहरात सुमारे दीड तास हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे टाकळी फाट्याजवळ असलेल्या कांदा व्यापारी मनोज जैन यांचे अंदाजे सात लाखांचे शेड जमीनदोस्त झाले. तसेच अंदाजे पंधरा लाखांचा कांदा पाण्यात भिजून खराब झाला. नवीन कांदा मार्केटजवळ असलेल्या आनंदा गिते यांच्या कांदा शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने सुमारे दोन लाख रुपयांचा कांदा पाण्यात भिजून खराब झाला. कोटमगाव रोडवरील राजू मुनोत यांच्या शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अंदाजे दहा लाख रुपयांचा कांदा पाण्यात भिजून खराब झाला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लासलगावसह परिसरातील गावांत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कांद्याचे शेड पडले आणि कांदा खराब झाला. त्यामुळे शेतकर्‍यांसह कांदा व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा शेतातच सडत आहे, तर काही ठिकाणी कांद्याचे दरही पडले आहेत. महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांनी केली आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago