नाशिक

निर्यातशुल्क वेळेत रद्द न केल्याने कांद्याचे भाव पडले

माजी खासदार शेट्टी ः योग्य वेळी पाऊल उचलणे आवश्यक होते

लासलगाव ः वार्ताहर
सध्या कांद्याला जो भाव मिळतोय तो कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढासुद्धा मिळत नाही. कांदा निर्यातशुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजारभाव पडले ही सरकारची जबाबदारी आहे.अर्थात सरकारला योग्य वेळी पाऊले उचलणे आवश्यक होते, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी लासलगाव येथे केली.
कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे नाशिक जिल्हा दौर्‍यावर आले असताना सोमवारी (दि. 21) त्यांनी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांसोबत लासलगाव बाजार समितीला भेट देऊन कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी बांधवाशी संवाद साधला. घसरत्या कांद्याच्या भावासंदर्भात चर्चा केली. यावेळी लासलगाव बाजार समिती, व्यापारी, शेतकरी यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती ललित दरेकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, संचालक छबूराव जाधव, प्रवीण कदम, सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी मनोज जैन यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृती गारे, संदीप जगताप, कृष्णा घुमरे, अनिता कोल्हे, आत्माराम पगार, गजानन घोटेकर, मच्छिंद्र जाधव, विलास दरगुडे, बाबासाहेब पगार व कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने निर्यातशुल्क आधीच हटवले असते तर निश्चितच कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपयांच्या पुढे गेले असते. दोन-तीन महिन्यांपूर्वीच अंदाज आला होता की, यावर्षी मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये कांद्याचे उत्पादन वाढले. गरजेपेक्षा कांद्याचा पुरवठा जास्त होतो म्हटल्यानंतर त्याची पर्यायी व्यवस्था करणे हे सरकारचं काम आहे. नाशवंत शेतमालासाठी हमीभाव कायदा मी सरकारच्या मानगुटीवर बसून मंजूर करून घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. नाफेडमार्फत होणार्‍या
खरेदीवर आमचा भरवसा नसल्याचेही त्यांनी सांगितले. नाफेडने योग्य अशा सहकारी संस्थांमार्फत प्रत्यक्ष बाजार समितीत उतरून कांदा खरेदी करावा, जेणेकरून स्पर्धा निर्माण होऊन कांद्याचे बाजारभाव वाढतील व कांदा उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली.
तसेच लवकरच आम्ही दिल्लीच्या नाफेडच्या कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात भेट देऊन लिलाव प्रक्रिये संदर्भात माहिती जाणून घेतली यावेळी कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago