डिजिटल सक्षरते अभावी फसवणूक प्रकारांत वाढ
नाशिक : अश्विनी पांडे
केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात डिजिटल माध्यमातून होणार्या ऑनलाइन व्यवहाराला चालना दिली असून कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात एटीएमचा वापरही वाढले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष बॅकेत जाऊन तासनतास रांगेत उभे राहत अर्थिक व्यवहार करण्याच्या ऐवजी मोबाईलच्या एका क्लिकवर अर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे.
डिजिटल माध्यमातून होणारे व्यवहार तात्काळ आणि सुसह्य झाले आहेत. कोरोना काळात ऑनलाइन व्यवहाराला अधिक महत्त्व आले. सोशल डिस्टन्सिंग पाळत व्यवहार करणे कोरोना काळात उपयोगी ठरले. मात्र या डिजिटल माध्यमातून होणार्या व्यवहाराचे जसे अनेक फायदे त्याप्रमाणे तोटेही आहेत. तरूण वर्गाला डिजिटल व्यवहार एक वरदान ठरत असल तरी वृध्दांसाठी डिजिटल व्यवहार मात्र अडचणीचे ठरू लागले आहेत. मोबाईलच्या माध्यमातून होणार्या ऑनलाइन पेमेंट करण्याची पध्दत समजून घेण्यास वयस्कर लोकांना कठिण जात आहे. तसेच अनेक वयस्कर लोकांची डिजिटल पेमेंट करत असताना मोठ्या प्रमाणात अर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे वयस्कर नागरिक ऑनलाइन माध्यमातून व्यवहार करण्यास घाबरतात. विशेष म्हणजे वयस्कर लोकांना ऑनलाइन व्यवहारात तर अडचणी येतच आहेत. मात्र बॅकेत जाऊन प्रत्यक्ष व्यवहार करणेही तापदायक ठरत आहे. कारण बॅक कर्मचारी दहा हजाराहून कमी रक्कम बँकेतून देण्यात टाळाटाळ करत असतात. त्यामुळे वयस्कर नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. एटीएम आणि ऑनलाइन व्यवहार जमत नाहीत.त्यात बॅकेत जाऊन व्यवहार करायचे म्हटल्यास पासबुक असूनही कमी रक्कम बँकेतून काढून देण्यास टाळाटाळ करत असल्याने वृध्द नागरिक हैराण झाले आहेत. अर्थिक व्यवहार नेमके कसे करायचे असा प्रश्न वृध्दासमोर निर्माण झाला आहे.
वृद्धांसाठी तापदायक
कॅशलेस व्यवहार तरूण वर्गासाठी फायद्याचे ठरत असले तरी वयस्कर नागरिकांना ऑनलाइन कॅशलेस व्यवहार करणे जिकरीचे ठरत आहे.
कॅशलेस व्यवहार वाढ
कोरोना काळात कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात आले.
बँकांमधील गर्दी झाली कमी
ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने बॅकेत होणार्या गर्दीचे प्रमाण घटले आहे. पुर्वी बॅकेत असणारी गर्दी आता काही प्रमाणात कमी असते.
पासबुकचा उपयोग कागदपत्रांसाठी !
बॅकिंक व्यवहार करण्यासाठी बँकेकडून ग्राहकांना पासबुक दिले जाते. मात्र ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने पासबुकचा वापर कमी झाला आहे. गुगल पे, फोन पे सुरू करण्यासाठी आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पासबुकचा वापर केला जात आहे.
चोरीचे प्रमाण घटले.
कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने नागरिक पाकिटात कमीत कमी प्रमाण पैसे ठेवतात. आणि पैसे लागल्यास ऑनलाइन माध्यमातून फोन पे अथवा गुगल पे चा वापर करत असतात.कदाचित याची चोरांना जाणिव झाली असावी म्हणून पाकिटमारीचे प्रमाण घटले आहे.
ऑनलाइन अर्थिक फसवणुकीत वाढ
प्रत्यक्षात चोरीचे पाकिटमारीचे प्रमाण कमी झाले असले तरी ऑनलाइन माध्यमातून अर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थिक फसवणूक झाल्याचे गुन्हे उघडकीस येत आहेत.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…