262 पदांसाठी विविध आस्थापना मध्ये संधी
नाशिक ः प्रतिनिधी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांचेमार्फत 25 ते 28 जुलै दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य ऑनलाईन पध्दतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हयातील बेरोजगारांना सहाय्य होण्याच्या दृष्टीने मुलाखती मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे स्काईप,व्हॉटस्ऍप द्वारे रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक व पुणे जिल्हयातील सहा नामांकित कंपन्यांतील 262 रिक्त पदे नियुक्ती अधिकारी ऑनलाईन तसेच मोबाईल/दूरध्वनी व्दारे पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड करणार आहेत.
या रोजगार मेळाव्यामध्ये 8 वी पास, एसएससी एचएससी, इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, वायरमन, मॅकेनिक मोटर व्हिकल, डिप्लोमा ,ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, बी.ई./बी.टेक 12 महिने अनुभव सह, डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल रिलेटेड, केमेस्ट्री, वेल्डर, गॅस वेल्डर, गॅस व इलेक्ट्रीक वेल्डर 6 महिने अनुभव सह, डिप्लोमा इन इंजिनियरींग, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, मशिनिष्ट आवश्यक सर्टिफीकेट सह इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे.
उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास ुुु.ीेक्षसरी. ारहरीुरूरा .र्सेीं.ळप या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. 0253 -2993321 वर संपर्क करावा जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अ.ला.तडवी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांनी केले आहे.
या आहेत आस्थापना आणि रिक्त पदे
1) महिंद्रा अँड महिंद्रा लि., नाशिक प्लांट, पदे- अप्रेंटिसशिप आणि ईपीपी ट्रेनीशिप, एसएससी इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर मॅकेनिक मोटर व्हिकल -50, एकूण पदे-50,
2)डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि. नाशिक, पदे- ऑपरेटर, पद-100, एकूण पदे-100,
3) मोंक ऑटोमेशन प्रा.लि. अंबड, नाशिक, पद- प्रोजेक्ट मॅनेजर -02,एकूण पदे-02,
4) तिरुमला इंडस्ट्रीयल एलाईड सर्व्हिसेस, प्रा.लि., पुणे पदे- डिप्लोमा -50, एकूण पदे-50,
5) स्लाईडवेल माईलर टेक्नोलॉजी प्रा.लि., पदे- उज2 वेल्डर -20 एकूण पदे-20,
6) तालेंसेतु सर्व्हिसेस प्रा.लि. पुणे, पदे- असेंबली लाईन ऑपरेटर, 20, पदे- मशिन ऑपरेटर-20, एकूण पदे-40, एकूण पदे-40 अशी एकूण -262 रिक्तपदे ऑनलाईन प्राप्त झाली आहेत.
हे ही वाचा :