विशेष-पोलीस-महानिरीक्षकांनी घेतला पूरपरिस्थितीतचा आढावा

 

चांदोरी : वार्ताहर

इगतपुरी , त्र्यंबकेश्वरसह धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या गोदावरी नदीच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी . जी . शेखर यांनी चांदोरी , सायखेडा पूल , सायखेडा पोलीस स्टेशन , नांदूरमध्यमेश्वर धरणाची पाहणी करत आढावा घेतला . पाणवेली काढण्याकरिता काही वेळ पूल बंद करण्यात आला होता . त्या ठिकाणी पाहणी करत सूचना दिल्या . याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे , सहायक पोलीस निरीक्षक पी . वाय . कादरी आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *