ऑनलाइन जुगार प्रकरणी कैलास शहा याला अटक

नाशिक प्रतिनिधी

ऑनलाइन जुगार प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी कैलास शहा याला नाशिक मधून अटक केली. जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील रामराव रसाळ याला पंचेचाळीस लाखांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी रसाळ यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात कैलास शहा आणि प्रीतम गोसावी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात केला होता. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी कैलास शहा याला अटक असून प्रीतम गोसावी अद्याप फरार आहे. एका पॉईंटला 36 रुपये देण्याचं आमिष देऊन रसाळ यांच्या मोबाईल मध्ये ऑनलाईन जुगाराचा ॲप डाऊनलोड करण्यात आला. त्यानंतर वेळोवेळी रसाळ यांच्याकडून पंचेचाळीस लाखांची आर्थिक फसवणूक करण्यात आली विशेष म्हणजे कैलास शहा याला या अगोदरही पोलिसांनी अटक केली होती मात्र कैलास शहा त्याची सुटका झाल्यानंतर त्याने परत हा जुगार सुरू केला होता. त्याच्यावर शहर आणि ग्रामीण मिळून एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. आता पोलिसांनी ऑनलाइन जुगारात फसवणूक झालेल्या नागरिकांना नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्याचे आवाहन केलंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *