नाशिक : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या एका विधिसंघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पीडितेच्या आईने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडितेची अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याने दि. 17 एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास अल्पवयीन मुलाने घरात येऊन दमदाटी करत अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केले. ही घटना मुलीने आईला सांगताच महिलेने देवळाली कॅम्प पोलीसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.