नाशिक

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख
मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता मोहीम म्हणजे केवळ फोटो काढण्यापुरता केलेला निव्वळ दिखावा आणि चमकोगिरी असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते गुरुकुमार निकाळे यांनी केला आहे. निकाळे यांनी एक प्रसिद्धिपत्रक व काही फोटो आणि व्हिडिओ रिलीज करत नगराध्यक्ष यांचा बालेकिल्ला असलेला हनुमाननगर हाच मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित असून, येथील गार्डनमध्ये अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
विशेषतः मनमाड शहरातील सर्वच पालिकेच्या उद्यानांची तीच अवस्था असून, सफाई कर्मचारी हे केवळ कामचुकारपणा करत आहेत. याला प्रशासकीय अधिकारीदेखील तितकेच जबाबदार असून, केवळ लाड-पागे कमिशनवर वारसाहक्काने नोकरी मिळवायची, मात्र काम शून्य अशी अवस्था आहे. हा सगळा प्रकार गंभीर असून, पालिकेच्या वतीने याकडे लक्ष दिले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निकाळे यांनी दिला आहे. मनमाड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी शहरात स्वच्छतेची मोहीम हाती घेतली, मात्र ती केवळ मोक्याच्या ठिकाणी खरी परिस्थिती जनतेच्या समोर आणली जात नाही. कोणीही बोलण्याची हिम्मत करत नाही, मात्र ही जनतेच्या डोळ्यात
धूळफेक सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही. जनतेला सत्य परिस्थिती लक्षात आणून देण्यासाठी आम्ही निषेधार्थ पत्रक काढले. काही व्हिडिओ व फोटोदेखील आम्ही दिले असल्याचे पत्रात म्हटले आहे. मुळात पालिकेच्या मालकीची उद्याने आहेत की नाही? हेच जनतेला माहिती नाही. ती आजपर्यंत जनतेसाठी वापरण्यात आलेली नाही. केवळ कागदोपत्री उद्याने आहेत, मात्र खरी परिस्थिती काही वेगळीच आहे. या उद्यानांत वाळूमाफियांनी आपले वाळूचे गोडावून बनवले आहेत. तर काही ठिकाणी कचराकुंडीचे रूप बघायला मिळते. नगराध्यक्ष योगेश पाटील व मुख्याधिकारी शेषराव चौधरी हे फोटोसेशन करून जनतेला वेड्यात काढत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सफाई कर्मचारी हे लाड-पागे समितीचे फायदे घेऊन कामाला लागतात. सफाई कर्मचार्‍यांनी स्वच्छता करावी, अन्यथा सफाई कामगारांचे लाभ सोडून द्यावे, असेही निकाळे यांनी म्हटले आहे.

प्रभागातील उद्यानांची दुरवस्था

निकाळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, नगराध्यक्ष योगेश पाटील ज्या हनुमाननगर प्रभागातून निवडून येतात, तिथेच स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. या भागातील सार्वजनिक गार्डनची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्याला सध्या कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्या लोकप्रतिनिधीला आपल्या स्वतःच्या प्रभागातील उद्यानाची निगा राखता येत नाही, त्यांनी संपूर्ण शहराच्या स्वच्छतेचा दावा करणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

Only a show of cleanliness in Manmad; Nationalist criticism

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

3 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

4 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

4 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

4 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

4 hours ago

स्व. डॉ. वसंतराव नगरकर : बहुआयामी व्यक्तिमत्त्व

नाशिकरोडच्या सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, राजकीय, शैक्षणिक, तसेच ट्रान्स्पोर्ट क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, आपल्या मनमिळाऊ…

5 hours ago