नाशिक

यूएईत  गुंतवणूकीची उद्योजकांना संधी 

 

 

आयमा अध्यक्ष निखील पांचाळ यांचे प्रतिपादन

 

नाशिक:प्रतिनिधी

 

यूएईत भारतीय उद्योजकांसाठी असलेल्या गुंतवणुकीच्या संधींचा नाशकातील उद्योजक आणि उदयोन्मुख निर्यातदारांनी लाभ घ्यावा आणि आपली उन्नती साधावी,असे आवाहन आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी केले.

 

भारतीय उद्योजकांसाठी यूएईत गुंतवणुकीच्या कोणत्या संधी आहेत याची माहिती देण्यास तेथील सरकारी अधिकारी चार्ल्स डॅनियल,गोमोन जॉर्ज,जितीन अमीन यांनी नाशिक दौऱ्यात अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन(आयमा) कार्यालयास भेट दिल्यानंतर आयमाचे पदाधिकारी आणि उद्योजकांबरोबर त्यांची संवाद बैठक झाली त्यावेळी पांचाळ बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आयमाचे सरचिटणीस ललित बूब,बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे,वरुण तलवार,हर्षद बेळे तसेच गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम ग्लोबलचे अध्यक्ष डॉ.सुनील मांजरेकर     हेसुद्धा होते.

 

यूएईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग,ऑइल अँड गॅस,फूड इंडस्ट्री,मॅरिटाईम इंडस्ट्री आदी  क्षेत्रांत भारतीय उद्योजकांना गुंतवणुकीच्या व आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यास चांगला स्कोप असून तेथे त्याबाबत कोणत्या सुविधा आणि सवलती यूएई सरकारतर्फे दिली जाते याची माहिती यूएईच्या अधिकाऱ्यांनी दिली.गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम ग्लोबलचे अध्यक्ष डॉ.सुनील मांजरेकर यांनी गल्फ राष्ट्रे तसेच आफ्रिकेतील अंगोला,काँगो आणि नायजेरियातील गुणवणुकीच्या संधीबाबत 30 मिनिटांचे सादरीकरण करून उद्योजकांनी विचारलेल्या  विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago