नाशिक

औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादनाला विरोध

आडवण, पारदेवी येथील शेतकर्‍यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

इगतपुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील आडवण, पारदेवी येथील शेतकर्‍यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनी औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात येणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतजमिनींची मोजणी करू नये, जमिनीच्या सातबारावर घेतलेल्या नोंदी रद्द करून कमी कराव्यात, या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांना देण्यात आले.
या शेतकर्‍यांनी जमिनी देण्यास नकार देत मोजणी करण्यास विरोध दर्शविला होता. यासाठी 1 मेस येथील शेतकर्‍यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांंनी नाशिक येथील कार्यालयात शेतकर्‍यांची 1 मेस बैठक घेतली होती. त्यावेळी सांगितले होते की, वरिष्ठांना विचारल्याशिवाय जमिनी मोजणी व नोंदी करणार नाही. पण कोणताही मार्ग न काढता शासनस्तरावर शेतजमिनीची मोजणी करीत सातबार्‍यावर नोंदी करण्यात आल्या.
आडवण, पारदेवी येथील शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत सातबार्‍यावर घेतलेल्या नोंदी त्वरित कमी कराव्यात. वडिलोपार्जित जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी देणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे दिला. औद्योगिक वसाहतीला विरोध दर्शवत सातबारावरील नोंदी कमी कराव्यात; अन्यथा मंगळवार(दि. 6)पासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. याबाबत शासनाने तत्काळ दखल घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. रमेश कोकणे, नवनाथ कोकणे, विश्राम शेलार, विष्णू कोकणे, नामदेव कोकणे, रामदास रेरे, ज्ञानेश्वर कोकणे, तुकाराम कोकणे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago