शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेचा उपक्रम
नाशिक :प्रतिनिधी
शिखर स्वामीनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त सेल्फी विथ शिवजन्मोत्सव या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शनिवार (दि 18 ) ते बुधवार (दि. 22) फेब्रुवारीपर्यंत आपल्या घरी शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी केलेली आकर्षक सजावट, देखावा, इत्यादी सोबतचा आपला एक सेल्फी व साजावटीचे फोटो खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावे.असे आवाहन शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा संगीता गायकवाड यांनी केले आहे.
स्पर्धेतील स्पर्धेतील विजेत्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.सेल्फी व साजावटीचे फोटो आपलेच स्वतः चे खरेखुरे असावेत, ईडीटेड कन्टेन्ट आढळून आल्यास ते स्पर्धेतून बाद ठरवले जाईल.सेल्फीत एक किंवा त्यापेक्षा अधिक कौटुंबिक सदस्य असल्यास ते देखील वैध मानले जाईल.सेल्फी व साजावटीचे स्वरूप पारंपरिक शिवकालीन व सामाजिक संदेश देणारे असावे, त्यात कुठल्याही प्रकारची बिभित्सता, अश्लीलता,आक्षेपार्हता ,नकारात्मकता नसावी. शिवाय त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी, तसे आढळल्यास तो स्पर्धक स्पर्धेतून बाद ठरवला जाईल.सर्व स्पर्धकांना या स्पर्धेत निःशुल्क सहभागी होता येईल, सदर उपक्रम केवळ शिवप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
आयोजकांचा निर्णय अंतिम राहील असे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…
नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी नांदगाव: प्रतिनिधी -…
मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…