जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटीचा भार
नवीदिल्ली : देशात आजपासून जीवनावश्यक आणि रोजच्या वापरातील काही वस्तुं महागणार आहेत. या वस्तुंवर पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार असल्याने सामान्यांची महागाईमुळे आणखी होरपळ होणार आहे.
आजपासून पॅक केलेले आणि लेबल असलेले दही, पनीर, लस्सी यावर आधिक जीएसटी भरावा लागणशर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. मागील महिन्यात जीएसटी परिषदेने विविध उत्पादनांवरील जीएसटी दर सुधारित केले आहेत.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने ते अधिसूचित केले आहेत. त्यामुळे सामान्यांचा खर्च महागणार आहे.दही, लस्सी, पनीर, मध,तृणधान्ये, मांस, मासे यांच्या खरेदीवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात पाच हजार रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या रुमवर पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. चेकबुक जारी करताना बँकाकडून आकारण्यात येणार्या शुल्कावर 18 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. दररोज एक हजार रुपयांपेक्षा कमी भाड्याने असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर बारा टक्के जीएसटी लागू असेल.
टेट्रा ॅपकवरील दर बारा टक्कयांवरुन 18 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. छपाई तसेच लेखन किंवा रेखांकन शाई, एलईडी दिवे यावर 12 ऐवजी 18 टक्के तसेच नकाशे, ऍटलस, ग्लोबवर, चाकू, पेन्सिल, पिठाची गिरणी, डाळ यंत्रावर पाच टक्कयांऐवजी बारा टक्के, तसेच सायकल पंप, सर्किट बोर्ड यावर बाराऐवजी अठरा टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
हेही वाचा : महागाईवरील ‘इंधन’ उतारा
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…