तारप्याला देव मानणाऱ्या भिकल्या धिंडा
यांना पद्म
वयाच्या 92 व्या वर्षी मिळाला पुरस्कार
मोखाडा: नामदेव ठोंमरे
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध तारपा वादक आणि अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या भिकल्या लाडक्या धिंडा. यांना अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा पद्म पुरस्कार घोषित करण्यात आला आहे .आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी अवघे आयुष्य वेचणारे धिंडा यांच्यावर पद्म पुरस्काराची मोहर उमटल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उत्कृष्ट तारपावादक म्हणून भिकल्या धिंडा यांची ओळख आहे. आपल्या वडिलांकडून मिळालेली ही कला त्यांनी तारपाची निर्मिती आणि वादन या दोन्ही कार्यांतून जोपासली. अनेक युवकांना ते वादनाचे धडे देत आहेत. घरातच तारपा वादनाचे काम वर्षानुवर्षे चालत असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच तारपा वाजवण्याची आवड होती. लहानपणी वयाच्या दहाव्या वर्षापासून ते जंगलात गुरे ढोरे चरावयास घेऊन जात असत.भिकल्या धिंडा यांच्या घराण्यात साधारणपणे शेकडो वर्षांची तारपा वादनाची परंपरा आहे.त्यांचे आजोबा नवसू धाकल्या धिंडा हे सुद्धा तारपा वाजवत असत,यासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. यामध्ये तारपा शिरोमणी पदवी सांस्कृतिक सेनानी सन्मान राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमी नवी दिल्ली कडून संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2022 देखील त्यांना प्राप्त झालेला आहे .याशिवाय 2023 मध्ये त्यांना पालघर भूषण आणि पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड दूध म्हणून सुद्धा त्यांची निवड करण्यात आली होती.याशिवाय देशभर होणाऱ्या विविध कला संस्कृती संदर्भात अनेक कार्यक्रमात भिकल्या धिंडा यांचा सन्मान करण्यात येतो. तसेच अनेक ठिकाणी त्यांचे तारपा वादनाचे कार्यक्रम होतात
भिकल्या धिंडा यांनी एका वाद्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे खरंतर भिकल्या धिंडा हे श्वास घेणारा तारपा आमचा देव मानतात.जव्हार तालुक्यातील वाळवंडा या गावातील रहिवासी असलेले भिकल्या धिंडा यांच्याकडे सुरुवातीला रोजगाराचे साधन उपलब्ध नव्हते,आपल्या कलेच्या जीवावर उदरनिर्वाह करण्यासाठी ते तारपा घेऊन विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीगेले.सुरुवातीला त्यांच्या या कलेकडे दुर्लक्ष झाले.मात्र आता ते तारपा वादक म्हणून जगप्रसिद्ध आहेत
“आम्ही आदिवासींची संस्कृती जपली आहे. आमच्या अनेक पिढ्या ही वाद्य वाजवत आहेत. गरीब घरातून आम्ही येत असलो तरी आमच्या संस्कृतीमुळं लोकं आम्हाला ओळखू लागली आहेत हीच आमची श्रीमंती आहे. अजूनही आमची परिस्थिती हलाखीची आहे. माझ्या कुटुंबात जवळपास 22 माणसं आहेत. दुसरा व्यवसाय, नोकरी नाही, थोडीफार शेती इतकंच माझं साम्राज्य आहे. महाराष्ट्र सरकारनंही मला याआधी पुरस्कार दिला होता. यातून मिळालेल्या पैशातून लहानशी झोपडी बांधली,” अशी भावना व्यक्त करत भिकल्या धिंडा यांनी मदतीची अपेक्षा लोकमतशी बोलताना बोलून दाखवली.
खरंतर आज भव्यदिवे स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या अनेक कलावंतांना किंमत आहे. मात्र घशाला कोरड पाडून शिरा ताणून छातीचा भाला करून जीवाच्या आकांताने
तारपा वाजवणारे कलाकार दुर्लक्षित राहिले आहेत. मात्र भिकल्या धिंडा यांना जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारामुळे अशा अनेक तारपा वादकामध्ये एक आशेचा किरण नक्कीच निर्माण झाला आहे आदिवासी भागात असे अनेक तारपा वादक आपल्या संस्कृतीचे जतन संवर्धन करत आहेत अशा अनेक कलाकारांचा सन्मान करून त्यांच्या कुटूंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे
आपली परंपरा, संस्कृती राखली. आदिवासी वाद्यामुळं मला अनेक पुरस्कार मिळाले. ओळख मिळाली या कार्यात माझी चौथी पिढी कार्यरत आहे. माझं आता 92 वर्ष वय असून, अवघ्या दहा व्या वर्षापासून मी हे वाद्य वाजवत आहे. हे वाद्य वाजवून देवांची आराधना करतो. त्यामुळं देवानं आशिर्वाद दिला,” अशी भावना भिकल्या धिंडा यांन’बोलताना व्यक्त केली.
आदिवासी समाज उत्सवप्रिय आहे ,तसेच निसर्ग पूजक असलेल्या या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे. शेतीच कांम संपली की पावसाळा संपता संपता “कामड्या” नाच होतो. हा रात्री ढोलकि च्या तालावर गोल फेर धरुन नाचतात पाऊस पडत नसेल तर काळमेघ (डोंगरात जाउन) आदिवासी बांधव नाच करतात नवीन आलेल पीक, नवीन भाताची लागवड, पुजा, ई. सामान्य प्रसंग.. त्याचाही उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते ठेका धरला जातो.दिवसभर काम करून थकलेल्या आदिवासींमध्ये तारप्याचा सूर ऐकल्यानंतर उत्साहन संचारतो.त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत याचा ताल धरला जातो,हातात हात गोप गुंडाळून गोल रिंगण ताल लय आणि सुराटीवर हे सामायिक नृत्य केले जाते. तारपा वाजवणारे या वाद्यात मोठ्या ताकतीने फुंकर मारून विविध प्रकारच्या नृत्यासाठी विविध सूर काढतात.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…