नाशिक : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, 30 जानेवारीला निवडणूक तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती उपायुक्त (सामान्य प्रशासन) उन्मेष महाजन यांनी दिली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना : 5 जानेवारी 2023
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 12 जानेवारी
अर्जांची छाननी : 13 जानेवारी
अर्ज माघारी : 16 जानेवारी
मतदान : 30 जानेवारी
मतमोजणी : 2 फेब्रुवारी
नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये सद्या डॉ. सुधीर तांबे हे नेतृत्व करीत आहेत. यावेळीही त्यांची निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू झालेली असून. याशिवाय हेमंत धात्रक हे देखील निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पदवीधरच्या मतदारांची नाव नोंदणी सुरू होती. सर्वच इच्छुकांनी त्यासाठी तयारी चालविली आहे.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…