तीन संशिंयतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर शिवारात डॉ. प्राची वसंत पवार यांच्यावर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. हल्लेखोरांनी कट करुन हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
एका संशयिताची आत्या सुश्रृत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. मात्र, उपचार सुरु असताना 12 मे 2021 रोजी मृत्यू झाला होता. हा राग मनात धरुन अभिषेक शिंदे याने त्यांचे साथीदार धनजंय भवरे व पवन सोनवणे यांना प्रत्येकी 10 हजार रुपये देण्याचे कबूल करुन डॉ. प्राची पवार यांना अद्दल घडविण्यासाठी हल्ला करण्याचा कट रचला होता. 19 डिसेंबर रोजी गोवर्धन शिवारात पवार हाऊस परिसरात डॉं प्राची पवार यांच्या इनोव्हा कारला दुचाकी आडवी लावत हुज्जत घालत त्यांच्यावर हल्ला केला होता.संशयितांनी धारधार शस्त्राचा वापर करत जखमी केले होते. नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची उकल झाल्यामुळे काल नाशिक तालुका पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे तसेच नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…