नाशिक : वार्ताहर
विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या चित्रकला शिक्षकास न्यायालयाने सात वर्षांचा सश्रम कारावास व २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अशोक रघुनाथ नागपुरे (वय ५७, रा. मिलेनियर पार्क, गजपंथ, म्हसरूळ) या शिक्षकाने विद्यार्थिनीच्या दुचाकीवर डबलसीट असताना फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. असाच अनुभव अन्य एका मैत्रिणीला आला असून, तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान वेळोवेळी घडला होता. या विद्यार्थिनीने शिक्षकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५४, ३५४ (अ), ५०६ व बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ च्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास करून जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याचे कामकाज क्रमांक ३ च्या न्यायालयात चालून न्या. एम. व्ही. भाटिया यांनी वरील शिक्षा ठोठावली. या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सुलभा सांगळे व रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहिले.
कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…
केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…